68 dams ambegaon Junnar Shirur Parner taluka should included in Kukdi project Dilip walse Patil sakal
पुणे

Pune News : आंबेगाव जुन्नर शिरूर पारनेर तालुक्यातील 68 बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करावा - दिलीप वळसे पाटील

कुकडी प्रकल्पातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर व पारनेर तालुक्यातील वितरण व्यवस्थेची कामे झालेली नाही.

डी.के वळसे पाटील

मंचर : “कुकडी प्रकल्पातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर व पारनेर तालुक्यातील वितरण व्यवस्थेची कामे झालेली नाही. या तालुक्यातील लाभ क्षेत्राला पाणी देण्यासाठी कुकडी,घोड व मीना नदीवरील ६८ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करुन घ्यावा, व त्यामध्ये पाणी सोडावे.”अशी मागणी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

पुणे येथे शासकीय विश्रामगृहात कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती व चासकमान प्रकल्पाच्या खरीप हंगाम २०२३-२४ नियोजन बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,

आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता डॉ.हनुमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर व पुणे, नगर, बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

“दिलीप वळसे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून मंजूर करून घेतला जाईल.” असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. या बैठकीत सध्या कुकडी प्रकल्पात २२.२० टीएमसी (७४.८१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाण्याचा विचार करून प्रकल्पातील सर्व कालव्यांचे खरीप हंगाम आवर्तन नियोजन करण्यात आले.

“यंदाचे वर्ष हे कमी पावसाचे असल्याने पाण्याचे काटेकोर नियोजन व काटकसरीने वापर करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. याची नोंद सर्वांनी घ्यावी.”

- दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री

तालुक्याचे नाव, बंधाऱ्याची संख्या व कंसात क्षेत्र :-

आंबेगाव :१६ बंधारे (सहा हजार हेक्टर)

जुन्नर : ३६ बंधारे (नऊ हजार हेक्टर)

पारनेर : सात बंधारे (साडेतीन हजार हेक्टर)

शिरूर : नऊ बंधारे (चार हजार हेक्टर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan: दिवाळीपूर्वीच ‘पीएम किसान’चा हप्ता;महाराष्ट्रातील ९१.८९ लाख लाभार्थ्यांना हप्ता

Pune HCMTR Project: ५१९२ कोटींच्या प्रकल्पावर आक्षेप; सार्वजनिक वाहतुकीच्या उद्देशाचे काय?

Pune Bus Fire : पुण्यात स्वारगेटजवळ धावत्या शिवाई बसला भीषण आग, १७ प्रवासी थोडक्यात बचावले

Pune Crime News: पैसे स्वीकारून घटस्फोट नाकारणाऱ्या पत्नीला दणका; न्यायालयाकडून पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर

Maharashtra Live News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT