PNE26W45991
सोलापूर : ‘हर्र बोला हर्र...’चा जयघोष करीत ६८ लिंग पदयात्रेत सहभागी झालेले सिद्धेश्वर भक्त.
१८ किमी... नऊ तास... ५० वर्षांची परंपरा; ६८ लिंग पदयात्रा
पावसासाठी साकडे; महिला-मुलींच्या सुरक्षेसाठीही प्रार्थना
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० : ‘हर्र बोला हर्र...’चा जयघोष आणि शिवनामाचा गजर करीत २५० हून अधिक सिद्धेश्वर भक्तांनी रविवारी १८ किलोमीटरची ६८ लिंग पदयात्रा पूर्ण केली. तब्बल नऊ तास चाललेल्या या पदयात्रेत भगवान महादेवांच्या ६८ रूपांच्या चरणी पावसासाठी तसेच महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी साकडे घालण्यात आले. तिसऱ्या श्रावणी रविवारी ६८ लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हिजनतर्फे या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर विविध मार्गांवर ‘हर्र बोला हर्र...’चा जयघोष आणि शिवनामाचा गजर सुरू होता. भक्तांनी मार्गातील ६८ लिंगांचे दर्शन घेत पदयात्रा पूर्ण केली.
--------------
१९७५ पासून परंपरा कायम
माझे बंधू कै. उमाकांत सावळगी, कै. शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले आणि पावडेप्पा भूशेट्टी यांनी १९७५ साली या पदयात्रेची सुरुवात केली. श्रावणात ६८ लिंगांचे दर्शन घेतल्यास १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते, अशी भावना आहे. त्यामुळे आम्ही ही परंपरा गेल्या ५० वर्षांपासून आजतागायत सुरू ठेवली आहे.
- बसवराज सावळगी, मार्गदर्शक, ६८ लिंग भक्त मंडळ
--------------
फराळापासून प्रसादापर्यंत व्यवस्था
पदयात्रेच्या मध्यंतरात मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालयात आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे पदयात्रेकरूंना फराळ व चहापान देण्यात आले. दुपारी तीन वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिरात आरती व पूजनाने पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी वीरशैव व्हिजनतर्फे पदयात्रेकरूंना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
--------------
पहिल्यांदाच ६८ लिंग पदयात्रेत
माहेश्वरी वाघमारे, राधिका अंगेरी, श्रुती गंगेरी, द्राक्षायणी अतने, हणमंत अतने, मीनाक्षी बशेट्टी, वंदना मस्कले, प्रतिभा चौगुले, रेश्मा पवार आणि वैष्णवी जावळे या सिद्धेश्वर भक्तांनी यंदा पहिल्यांदाच ६८ लिंग पदयात्रेत सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.