पुणे

कुदळवाडीत भंगाराची सात गोदामे खाक

सकाळवृत्तसेवा

चिखली - कुदळवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत भंगार मालाची सात गोदामे जळून खाक झाली. आग लागलेल्या गोदामाशेजारीच ऑइलची कंपनी होती. या कंपनीच्या मागच्या भागालाही आग लागली. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावून प्रथम कंपनीला लागलेली आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी पाच बंब व स्थानिक नागरिकांचे पाण्याचे दहा टॅंकरच्या साह्याने भंगार मालाच्या गोदामाला लागलेली आग बुधवारी पहाटे आटोक्‍यात आणली. 

अग्निशामक दल आणि प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडीत आग लागण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चिखली-मोशी रस्त्यावरील चौधरी वजन काट्याजवळ भंगार मालाच्या गोदामाला आग लागली. दोन गोदामांमध्ये पत्र्याच्या भिंती असल्याने ही आग शेजारील ऑइलचे पिंप साठवलेल्या गोदामाला लागली. आग लागल्याने ऑइलच्या पिंपानी पेट घेऊन ते इतरत्र पसरत होते. पिंप पेटल्यावर मोठा आवाज होऊन ते इतरत्र उडून पडत होते. त्यामुळे शेजारच्या सात गोदांमानीही पेट घेतला. आग लागलेल्या गोदामाशेजारीच ऑइलची कंपनी आहे. पिंप उडून पडत असल्याने या कंपनीच्या पाठीमागील भागाने पेट घेतला. या कंपनीत तेलाचा मोठा बॅरल होता. कंपनीच्या सिमा भिंतीला आग लागताच मोठा अनर्थ घडेल या भीतीने नागरिक जीव मुठीत धरून वाट दिसेल त्या दिशेने सैरावैरा पळत सुटले. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठे धैर्य दाखवून कंपनीच्या मागील भागातील आग विझविली. त्यानंतर बुधवारी पहाटे गोदामांची आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. आगीमुळे सर्व परिसर धुराने माखला होता. दरम्यान, भंगारमालाच्या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा असल्याने बुधवारी दिवसभर परिसरात धूर दिसत होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT