पुणे

पेट्रोल पंपावर ‘स्वाइप’द्वारे तब्बल ७ लाखांची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे - गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तो वर्षभर पेट्रोल पंपावर यायचा. पेट्रोल भरून पंपावरील कर्मचाऱ्याकडे स्वाइप मशिनमध्ये एटीएम कार्डद्वारे पैसे देत असे. रोख रक्कम पाहिजे असल्याचे सांगत तो पेट्रोलच्या बिलापेक्षा अधिक रक्कम कार्ड स्वाइप करून घेण्यास सांगत असे. त्यानंतर पैसे भरल्याची स्लीप दाखवत तो हातचलाखीने मशिनवरील व्हाइड बटन दाबून व्यवहार रद्द करत होता. त्यामुळे ते पैसे पेट्रोलपंप मालकाच्या खात्यात जमा होत नव्हते. अशा तऱ्हेने पेट्रोल पंप मालकाची ७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्यास हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

 नवनाथ संपत महाडिक (वय २३, रा. फुरसुंगी, मूळ रा. पाथर्डी, नगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अजिंक्‍य अशोक टेकवडे (वय २८, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचा हडपसरमधील आकाशवाणीसमोर टेकवडे पेट्रोल पंप आहे. त्यांच्या पेट्रोल पंपावर महाडिक हा दररोज येऊन त्याच्या वाहनामध्ये पेट्रोल भरत असे. पेट्रोल भरल्यानंतर एटीएम कार्डद्वारे पेट्रोलचे पैसे देत होता. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याकडे तो एटीएम कार्ड स्वाइप करण्यासाठी देत असे. त्या वेळी कमी पैशाचे पेट्रोल भरून जास्त पैशाची गरज आहे, असे सांगून स्वाइप कार्ड मशिनवर एटीएम कार्डचा वापर करून जास्त पैशांची पावती काढत होता. प्रत्यक्षात फिर्यादी यांच्या बॅंक खात्यामध्ये पैसे जमा होत नव्हते. हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर महाडिकची चौकशी करून त्याला ताब्यात घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT