attempt to suicide  esakal
पुणे

Pune: 'डिजेचा आवाज अन् कोयत्याचा वार' अपमान सहन न झाल्याने वृद्धाची नदीत उडी मारून आत्महत्या

पुण्यात धक्कादायक प्रकार

धनश्री ओतारी

पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. 70 वर्षीय नागिरकाने स्पिकरच्या आवाजाला आणि झालेल्या अपमानाला कंटाळून आत्महत्या केली. पुण्यातील येरवडा भागात ही घटना घडली. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.(70 year old man committed suicide after being fed up with the sound of the speaker pune )

ज्ञानेश्वर साळुंखे (वय 70) असे या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले, देवेश ऊर्फ नन्या पवार, यश मोहिते, शाहरुख खान, जय तानाजी भडकुंभे या ५ जणांना अटक केली आहे. (Marathi Tajya Batmya)

नेमकं काय घडलं?

चेतन बेले हा फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी राहायला आहे. त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याने स्पीकर लावला होता. स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज करु नका, आम्हाला त्रास होतो असे सांगितले. यावरून आरोपींनी त्यांचा अपमान केला आणि हाकलून दिलं.(Marathi Tajya Batmya)

पुन्हा साळुंखे त्या ठिकाणी आवाज कमी करायला सांगण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. त्यांनी फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी यांनी

पुन्हा फिर्यादीचे वडिल ज्ञानेश्वर साळुंखे यांना मारहाण केली. मारहाणीमुळे होणार्‍या वेदना व अपमान सहन न झाल्याने त्यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली.(Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT