पुणे

पुरंदर : नारायणपूरात कोरोनाचा पहिला मृत्यू, गावात भीतीचे वातावरण

दत्ता भोंगळे

गराडे (पुणे) : नारायणपूर (ता. पुरंदर) येथे रविवारी नारायणेश्वर मंदिराजवळील एका कुटुंबातील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गावातील एकूण चार रुग्ण होते. पैकी आज एक मयत झाल्यामुळे तीन रुग्ण गावात असल्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून सर्व गोष्टींचे पालन करण्यात येत असल्याची माहिती ग्रामसेवक रोहित अभंग यांनी दिली.

यावेळी सरपंच सुजाता बोरकर, उपसरपंच अनिल खोमणे, तलाठी अलोनी,  माजी सरपंच रामभाऊ बोरकर, दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर आदी उपस्थित होते. खबरदारीचा उपाय म्हणून गावात आतापर्यंत सहा वेळा औषधांची फवारणी करण्यात आली असून, गावातील लोकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती माजी सरपंच रामभाऊ बोरकर यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात ज्यावेळी लॉकडाउन सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत नारायणपूरमध्ये सर्व दुकाने बंद आहेत. दत्त मंदिराची ख्याती अनेक राज्यात आहे. त्यामुळे अनेक राज्यातील लोक दत्तजयंती सोहळ्यानिमित्त नारायणपूर येत असतात. तसेच, गुरुवारची येथे नेहमी गर्दी असते. पण लॉकडाउनपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. जर दुकाने उघडी ठेवली, तर लोकांची वर्दळ होते. हे पाहिल्यानंतर नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामस्थांनी घरातच राहावे. विनाकारण बाहेर पडू नये. तसेच, बाहेर पडताना मास्क लावावा, असे आव्हान क्षीरसागर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT