पुणे

कोरोनामुक्त झालेल्या शिरूरच्या पूर्व भागात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

प्रताप भोईटे

न्हावरे (पुणे) : लग्न समारंभात सहभागी झालेल्या नागरगाव (ता. शिरूर) येथील एका ७० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निमोणे आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा डॅनियल यांनी दिली. त्यामुळे शिरूरच्या पूर्व भागात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

शिरूरच्या पूर्व भागात न्हावरे येथे प्रथम दोन रुग्ण आढळले. त्यानंतर अनुक्रमे मांडवगण फराटा येथे एक, कोकडेवाडीत एक, बाभुळसर येथे एक, तर कुरूळी येथे दोन रुग्ण आढळले होते. आता सातही रुग्ण ठणठणीत होऊन शिरूरचा पूर्व भाग कोरोनामुक्त झाला होता. मात्र, आता नागरगाव येथे रुग्ण आढळल्याने कोरोनाने पुन्हा पुर्व भागात शिरकाव केला आहे. ७० वर्षीय महिला वीस दिवसांपूर्वी नातेवाइकाच्या लग्नाला गेली होती. लग्नाहून परत आल्यानंतर सात दिवसापांसून त्यांना सर्दी, खोकला, ताप असा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांची विश्वराज हॉस्पिटल येथे कोरोना चाचणी केली. तेव्हा तपासणीचा अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत माहिती देताना निमोणे आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. डॅनियल म्हणाल्या, की कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या आहेत. याचा शोध सुरू असून, त्यांना क्वारंटाइन केले जाईल. त्याचबरोबर कंन्टेमेंट झोन निश्चित करून त्या परिसरात औषध फवारणी केली जाईल. नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. ग्रामपंचायत प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सक्रिय झाले असून, नागरिकांनी कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सुरक्षित खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मनिषा शेलार यांनी केले.

Edited by : Shivnandan Baviskar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

दुष्काळी दौऱ्याच्या गर्दीवर डोळा; लुटीचा डाव भोकरदन पोलिसांनी २४ तासांत उधळला!

SCROLL FOR NEXT