corona1
corona1 
पुणे

खेडमध्ये कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात ७५ रुग्णांची भर

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात कोरोना संसर्ग आता उद्रेकाच्या पातळीवर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांची संख्या ४७१ झाली आहे. गेल्या अवघ्या २४ तासात कोरोनाबाधितांची संख्या ७५ ने वाढली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे यांनी दिली. 

खेड तालुक्यात आज तब्बल ७५ रुग्णांची भर पडली. आजपर्यंतचा हा उच्चांक आहे. आज चाकणला एकदम ४३ रुग्ण वाढले. राजगुरुनगर, खराबवाडी, शेलपिंपळगाव, वेताळे, मोहितेवाडी, रासे, शिरोली, महाळुंगे या गावातून प्रत्येकी एक रुग्ण आढळला. तर, चांडोलीला ७, केळगावला ५, मेदनकरवाडीला ३, च-होलीला ३, आंबेठाणला २, शेलगावला २ आणि तिन्हेवाडीला २, असे मिळून ३२ रुग्ण वाढले.

चाकण येथील एक रूग्ण  रात्री दगावला. त्यामुळे कोरोनाने दगावलेल्यांची संख्या तालुक्यात आता दहावर गेली आहे. सध्या २५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर, एकूण २०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमध्ये १८१ जणांवर उपचार सुरु आहेत. तर, चाकण येथील रुग्णालयात ३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतर रुग्ण पुणे व पिंपरी चिंचवड येथील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आणि काही जण होम क्वारंटाइन होऊन उपचार घेत आहेत. 
   
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT