पुणे

बारामती परिमंडलात शेतकऱ्यांचे 75 कोटींचे वीजबिल माफ

मिलिंद संगई

बारामती : ‘महा कृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घेत शेतीपंपाचे थकीत वीजबिल भरणाऱ्या बारामती परिमंडलातील 72751  शेतकऱ्यांचे तब्बल 75 कोटी 48 लाख रुपये माफ झाले आहेत. 

सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित थकबाकी माफ होत असून, वीजबिल कोरे झाल्याचे प्रमाणपत्रच शेतकऱ्यांना महावितरणतर्फे देण्यात येत असल्याने शेतकरी थकीत वीजबिल भरण्यासाठी पुढे येत आहेत. 

बारामती परिमंडलातील 7 लाख 36 हजार 932 शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यापैकी 72 हजार 751 शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा फायदा घेतला आहे. त्यांनी थकीत व चालू बिलापोटी मिळून 115 कोटींचा भरणा केला. त्यातील त्यांच्या थकबाकीच्या 50 टक्के रक्कम सुमारे 75 कोटी माफ झाली. यामध्ये बारामती मंडलातील 28390, सातारा 29816 व सोलापूर मंडलातील 14545 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे 41.40 कोटी, 55.85 कोटी व 17.95 कोटी रुपये भरले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी परिमंडलात ‘एक गाव, एक दिवस’ सारखे उपक्रम गावांगावात राबविल्याने शेतकरी ग्राहकांच्या वीज समस्या दूर झाल्या आहेत त्या मुळे शेतकऱ्यांनीही ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’  या उक्तीनुसार वीजबिल कोरे करण्याचा संकल्प केलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी महावितरण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना या योजनेचे महत्व पटवून देत आहे. बारामती परिमंडलात महावितरणच्या वतीने वीजबिल वसूलीची मोहिम सध्या तीव्र करण्यात आली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

SCROLL FOR NEXT