750 corona patients in a day in Pune
750 corona patients in a day in Pune 
पुणे

Corona Update : पुण्यात दिवसभरात कोरोनाचे ७५० रुग्ण

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : पुण्यात दिवसभरात कोरोनाचे जवळपास ७५० रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने खबरदारीचे नवे उपाय अमलात आणण्यावर महापालिकेने भर दिला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करीत, अंमलबजावणीची यंत्रणा रस्त्यावर उतरविण्यात येणार आहे.
 

कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी तीन दिवसांपासून मर्यादित काळापुरती बंधने आणली आहेत. परिणामी, या काळात रुग्णसंख्या कमी होण्याची आशा होती. प्रत्यक्षात मात्र रोजच्या रुग्णसंख्येत भर पडत असल्याची आकडेवारी शुक्रवारी पुढे आली. दिवसभरात ६ हजार ५१४ नागरिकांच्या चाचण्या केल्या. त्यापैकी ७४३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत १४ ते १५ टक्के नागरिकांना कोरोना होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पूजा चव्हाण मृत्यू : दोघं कुठं गेले? घटनेनंतर दिली होती कबुली; चित्रा वाघ यांचा खुलासा

शाळा, महाविद्यालये बंद असली तरी बाजारपेठा, मॉल, हॉटेलमध्ये गर्दी होत आहे. त्याशिवाय, खासगी आणि सरकारी वाहतूक व्यवस्थेत अजूनही प्रवासी मोठ्या संख्येने दिसत आहेत. या ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने सांगितले.

महापालिकेचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, "वातावरणातील बदलामुळे लोकांना श्‍वसनाचे त्रास होत आहेत. हा त्रास दोन-चार दिवस राहिलेल्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणताही त्रास जाणवणाऱ्यांनी कोरोनाच्या चाचणीला प्राधान्य द्यावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT