पुणे

रिंगरोडसाठी पिंपरीत आठशे इमारती पाडणार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील नियोजित रिंगरोडच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या रहाटणी, थेरगाव आणि वाल्हेकरवाडी येथील सुमारे साडेआठशे इमारती भुईसपाट करणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी सोमवारी ‘सकाळ’ला दिली.

खडके म्हणाले, ‘‘हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोडचे (एचसीएमटीआर) सुमारे ७० टक्के क्षेत्र ताब्यात आहे. प्राधिकरण हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. सुमारे ३० किलोमीटर लांब रस्त्यात साडेपाच किलोमीटर अंतरात अतिक्रमण झाले आहे. त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. थेरगाव पेठ क्रमांक ३५ आणि ३७ मध्ये ३०० पेक्षा जास्त, रहाटणी परिसरातील पेठ क्रमांक ३८, ३९ मध्ये सुमारे १००हून जास्त अतिक्रमणे आहेत. वाल्हेकरवाडीतील संपादित क्षेत्रात पेठ क्रमांक ३०, ३१, ३३ मध्ये तब्बल ४५० इमारती बांधल्याचे आढळले आहे.पोलिस बंदोबस्त उपलब्ध होईल तशी बांधकामे पाडण्यात येतील. रिंगरोड पूर्णतः रिकामा करण्याचे नियोजन आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flower Market: झेंडूच्या फुलांनी बाजार बहरला! दसऱ्यामुळे पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात झेंडूची मोठी आवक; किलोला ३० ते ७० रुपये भाव

Panvel-Karjat Local: दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत, पनवेल-कर्जत मार्गाला गती; डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

Food Inflation: दिवाळीनंतर साबण-बिस्किटांचे दर वाढणार? पार्ले कंपनीने दिला इशारा; साखर, खाद्यतेलाचं काय होणार?

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' मतमोजणीला सुरुवात; राधानगरी तालुक्यात पहिल्या 25 मतपत्रिकांपैकी नऊ मतपत्रिकांवर पॅनेल टू पॅनेल मतदान

Gokul Milk Union Election : गोकुळच्या मतमोजणीत क्रॉस व्होटिंगचा मोठा बॉम्ब!; राधानगरीत पहिल्या २५ मतपत्रिकांमध्ये ६४ टक्के क्रॉस व्होटिंग

SCROLL FOR NEXT