mhada 
पुणे

"म्हाडा'साठी एकाच दिवसात 81 हजार जणांची नोंदणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सदनिकांसाठी एकाच दिवसात तब्बल 81 हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी झाली आहे. इच्छुकांना येत्या 11 जानेवारीपर्यंत ही नोंदणी करता येणार असल्याचे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी आज (ता.11) सांगितले. 

पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाच हजार 647 सदनिकांसाठी 22 जानेवारीला सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत सहभाग घेण्यासाठी कालपासून (ता.10) ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाइन नोंदणीचा शुभारंभ गुरुवारी (ता.10) सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माने म्हणाले, ""पुणे म्हाडाची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी सोडत आहे. याआधी एवढ्या मोठ्या संख्येने सदनिकांची सोडत कधीच झाली नाही. या सोडतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत तब्बल 1 लाख 34 हजार युजर्स झाले आहेत. यापैकी 81 हजार 4 जणांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्यांपैकी 72 हजार 907 जणांची नोंदणी मंजूर झाली आहे. 1 हजार 968 जणांची नोंदणी त्रुटींमुळे नाकारली गेली आहे. आणखी 6 हजार 98 जणांच्या नोंदणीची मंजुरी प्रलंबित आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Ahilyanagar Gas Shortage: एक लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत; अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज २५ हजार सिलिंडरचे वाटप, हाॅटेल, रेस्टॉरंट उद्योगांना मर्यादा!

Virar News : धर्म स्वातंत्र्य कायद्याला कॅथलिक बिशप्सचा विरोध; संविधानिक अधिकारांवर गदा असल्याचा आरोप

Solapur politics: सोलापुरातील सिद्धेश्वर देवस्थानच्या भूमिकेने कोठे गट तोंडघशी; लिंगायत स्मशानभूमी प्रकरणातील राजकारण भाजपच्या अंगलट!

SCROLL FOR NEXT