Yerwada Jail sakal
पुणे

CCTV Camera : येरवडा कारागृहात ८१२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांची हाणामारी रोखण्यासाठी येरवडा कारागृहात ८१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांची हाणामारी रोखण्यासाठी येरवडा कारागृहात ८१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या यंत्रणेचे उद्घाटन गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांच्या हस्ते शनिवारी (ता. ३) झाले.

कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर आणि उपमहानिरिक्षक स्वाती साठे यावेळी उपस्थित होते. कारागृहातील गैरप्रकार रोखणे, तसेच कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे फायदेशीर ठरणार असल्याचे रस्तोगी यांनी नमूद केले.

राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर नियंत्रण कक्षातून कारागृहातील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे, असे गुप्ता म्हणाले.

कॅमेरे कंट्रोल रूमशी जोडले जाणार -

राज्यभरातील १६ मध्यवर्ती कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यांच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पुण्यातून करण्यात आली. सीसीटीव्हीमुळे कारागृह प्रशासनाला एकाच ठिकाणावरून कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. राज्यातील विविध कारागृहांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे सर्व कॅमेरे कारागृहातील नियंत्रण कक्षाशी (कंट्रोल रूम) कॅमेरे जोडले जाणार आहेत.

कारागृहाचे ठिकाण व कॅमेऱ्यांची संख्या

मुंबईत - ३२०

कल्याण - २७०

भायखळा - ९०

अमरावती - १०६

नागपूर - ७९६

नाशिक रस्ता- ९४१

नाशिकमधील किशोर सुधारालय - ८६

लातूर - ४६०

जालना - ३९९

धुळे - ३३१

नंदूरबार - ३६५

सिंधूदुर्ग - ३१५

गडचिरोली -४३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT