पुणे

इंग्रजीच्या पेपरला 82 कॉपीबहाद्दर 

सकाळवृत्तसेवा

सर्वाधिक लातूरमध्ये; तर मुंबई, कोकण विभागात शून्य 

पुणे - बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने राज्यात 82 विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आले. लातूर विभागात सर्वाधिक 34 जणांवर कारवाई करण्यात आली; तर मुंबई व कोकण या दोन विभागांत एकही विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळलेला नाही, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. 

शिक्षण मंडळाकडून 12वी व 10वीची परीक्षा शांततेत व गैरप्रकारविरहीत व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातात. स्थानिक दक्षता समिती, केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थी उद्बोधन, प्रजासत्ताकदिनी प्रार्थना, पालकसभा घेऊन विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी जनजागृती केली होती. परीक्षेच्या दिवशी थेट कारवाई करण्यासाठी 273 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना ऐनवेळी सकाळी कोणत्या उपद्रवी परीक्षा केंद्रांना भेटी द्यायच्या, याच्या सूचना मंडळाने दिल्या होत्या. 

इंग्रजी विषयाची भीती असल्याने या पेपरला सर्वाधिक कॉपी करण्यासाठी विद्यार्थी तयारीत असतात. विशेषतः ग्रामीण भागामध्ये कॉपीची प्रकरणे जास्त घडतात. त्यामुळे परीक्षा केंद्रप्रमुख, परीक्षकांना व्यवस्थित लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

इंग्रजीच्या पेपरला सर्वाधिक कॉपीची प्रकरणे लातूर विभागात झाली असून, तेथे 34 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. पुणे विभागात 6, नागपूर 4, औरंगाबाद 7, कोल्हापूर 4, अमरावती 9, नाशिक विभागात 18 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली; तर मुंबई व कोकण विभागात एकाही विद्यार्थ्यावर कॉपीची कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT