Police
Police 
पुणे

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवल्याने व्यापाऱ्याला कोटींचा फटका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्हॉट्स अॅपच्या आहारी जाताना कित्येकांना पाहतो. आपण कुठे जातो, कुठे निघालो आहे, काय करतो हे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्याची काहींना सवय असते. एका व्यापाऱ्याला हिच सवय महागात पडली आहे. चोरट्यांनी या व्यापाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटसवरून लक्ष ठेवून तब्बल साडेनऊ किलो सोने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दौंड ते कुंभारगाव दरम्यान सराफी व्यवसायातील कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला 48 तासांत अटक करून त्यांच्याकडून 9 किलो 600 ग्रॅम सोन्यासह एकूण 3 कोटी 70 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण ही कारवाई केली आहे.

दौंड रेल्वे स्थानक ते कुरकुंभ (ता. दौंड) ते कुंभारगाव (ता. इंदापूर) दरम्यान 6 नोव्हेंबरला प्रवासात सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या दोन जणांना मारहाण करून त्यांच्याकडील एक किलो सोने चोरीस गेल्याची फिर्याद अप्पा श्रीराम कदम (वय 32, रा. कौठुली, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी 7 नोव्हेंबरला दिली होती. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर व्यापारी नेहमी दौंड येथे उतरून सोने घेऊन जात असे. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी सोन्याचे बिस्कीट घेऊन जाताना ‘गुडबाय कौठळी’ असे स्टेटस ठेवले होते. व्यापाऱ्यावर पाळत ठेवून असणारे चोरट्यांना व्यापारी घर सोडून सोने आणण्याकरिता गेल्याची खात्री पटली. व्यापाऱ्याला लुटण्याचा कट रचून चोरट्यांनी डाव साधला,

सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला होता. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त अधीक्षक जयंत मीना, उपअधीक्षक सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्‍लेषण आणि प्राप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तपास केला असता सदरचा गुन्हा दिघंची (जि. सांगली) येथील टोळीने केल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणी गणेश दगडू पवार (वय 27), अभिजित ऊर्फ बाळू दिलीप चव्हाण (वय 23, दोघे रा. महुत, नागणखोरा, ता. सांगोला, जि. सोलापूर), मोहसीन हमजेखान मुलाणी (वय 25), प्रथमेश विजय भांबुरे (वय 26, दोघे रा. दिघंची, कटफळ गल्ली, ता. आटपाडी, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली. चौघांकडून 9 किलो 500 ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, सोन्याची तीन मोठ्या पट्ट्या, चार मोबाईल संच, एक एअर गन, एक टाटा इंडिगो कार, असा एकूण 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चौघा आरोपींना महुत येथून अटक करण्यात आली. सदर गुन्ह्यातील पाचवा संशयित आरोपी विजय दगडू पवार (रा. महुत, जि. सोलापूर) हा फरार आहे.

तपास पथकास रोख बक्षीस
या गुन्ह्याचा 48 तासांत छडा लावणाऱ्या पोलिस पथकास पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांनी पस्तीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पथकात पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांच्यासह सहायक फौजदार दयानंद लिमण, हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, मोरेश्वर इनामदार, राजू पुणेकर, मुकुंद आयचित, पोलिस नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत, प्रवीण मोरे, नितीन भोर व कॉन्स्टेबल अक्षय जावळे यांचा समावेश होता.

फक्त एक किलो सोने चोरीची फिर्याद
दौंड-कुरकुंभ ते कुंभारगाव दरम्यान झालेल्या या प्रकारात एकूण 9 किलो 600 ग्रॅम सोने चोरीस गेले होते. परंतु प्राप्तिकर विभागाकडून चौकशी होऊ नये म्हणून एक किलो सोने चोरीची फिर्याद गुन्हा घडल्यापासून 38 तास उशिराने देण्यात आली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT