ghee adulteration 
पुणे

भेसळीचा संशय आल्याने तब्बल ९ लाखाचा तूप साठा जप्त  

सकाळवृत्तसेवा

पुणे - भेसळीच्या संशयावरून नऊ लाख ३७ हजार रुपये किमतीचा तुपाचा साठा जप्त केला. याचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्याच्या अहवालावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) सांगण्यात आले.

लेबल नसलेल्या तुपाच्या डब्याची वाहतूक करणारा टेंपो भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडला. त्यांनी त्याची माहिती ‘एफडीए’च्या कार्यालयाला दिली. ही माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर घटनास्थळावर गेल्या. त्यांनी तुपाचे शंभर डबे जप्त केले. त्याचे वजन सुमारे दीड हजार किलो आहे. त्याची बाजारातील किंमत चार लाख ४९ हजार ७०० रुपये आहे. तुपाचा हा साठा भेसळयुक्त व कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून तो जप्त करून त्याचे नमुने घेण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे तूप शिवण्यातील धावडे इंडस्ट्रियल इस्टेटमधील डी. जी. एम. इंडस्ट्रीज येथून खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथील एक हजार २३ किलो वजनाचे चार लाख ८७ हजार ५९० रुपये किमतीचे तूप जप्त केले. अस्वच्छ वातावरणात हे तूप तयार केले जात होते. त्यामुळे त्याचे नमुने घेण्यात आले. या दोन्ही ठिकाणी मिळून दोन हजार ५२२ किलो तूप जप्त केले.

अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे, राजेंद्र काकडे, अर्चना झांजुर्णे, अन्वेषक राजेश आल्हाट यांनी पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, सहायक आयुक्त बा. म. ठाकूर आणि सी. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

अन्न सुरक्षा व मानदे कायद्याची गेल्या नऊ वर्षांपासून राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, सकल आणि निर्भेळ अन्नपदार्थ पुरवठा करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. 
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, ‘एफडीए’, पुणे विभाग

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

SCROLL FOR NEXT