90 percent increase in construction sector transactions in Pune from Credai CRE report pune metro sakal
पुणे

Pune News : पुण्यातील बांधकाम क्षेत्राच्या व्यवहारात ९० टक्क्यांनी वाढ; ‘क्रेडाई सीआरई’ अहवालातील निष्कर्ष

२०१९ च्या तुलनेत येथील बांधकाम क्षेत्रातील व्यवहारात तब्बल ९० टक्क्यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत पुण्यातील बांधकाम व्यवसाय बाजारपेठ ही परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी असल्याचे ‘क्रेडाई पुणे मेट्रोच्या’ ‘क्रेडाई सीआरई’ अहवालातून समोर आले आहे.

२०१९ च्या तुलनेत येथील बांधकाम क्षेत्रातील व्यवहारात तब्बल ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर २०२३ च्या पहिल्या सहामाहीत २८ हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘सीआरई मॅट्रिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता आणि डेटा विश्‍लेषक राहुल अजमेरा यांनी हा अहवाल नुकताच ‘मेंबर असिस्टंस मिटींग’ मध्ये मांडला. क्रेडाई पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, व्यवस्थापकीय समिती सदस्य अभिषेक भटेवरा आणि महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर यावेळी उपस्थित होते.

अहवालासंदर्भात ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, ‘‘अहवालातील जानेवारी ते जूनमधील आकडेवारीनुसार शहराची बांधकाम व्यवसाय बाजारपेठ ही देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत सर्वांत वेगाने वाढणारी आणि परवडणारी बाजारपेठ आहे.

जानेवारी ते जून २०२३ दरम्यान पुनर्विक्री वगळून पुण्यात ४५ हजार घरांची विक्री झाली आहे. याची किंमत ही तब्बल २८ हजार कोटी रुपये आहे. २०१९ च्या तुलनेत यामध्ये ९० टक्के वाढ झाली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT