Pune Porsche accident  
पुणे

Pune Porsche Accident: पोर्शे अपघात प्रकरणात तब्बल 900 पानांचे आरोपपत्र दाखल, पण मुख्य आरोपीचे नाव का नाही?

Pune Porsche accident case charge sheet filed: आरोपपत्रामध्ये अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांचा देखील समावेश आहे. याशिवाय, डॉ. अजय तावडे, श्रीहरी हरनोर, अतुल घाटकांबळे, अश्पक मकंदर आणि अमर गायकवाड यांची नावे देखील आहेत.

कार्तिक पुजारी

Pune News: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी सात आरोपींच्या विरोधात पुण्याच्या कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रामध्ये अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांचा देखील समावेश आहे. याशिवाय, डॉ. अजय तावडे, श्रीहरी हरनोर, अतुल घाटकांबळे, अश्पक मकंदर आणि अमर गायकवाड यांची नावे देखील आहेत.

एकूण ९०० पानांचे हे आरोपपत्र आहे. मात्र, या आरोपपत्रामध्ये अल्पवयीन मुलाच्या नावाचा समावेश नाही. १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीचा खटला बालन्याय मंडळासमोर (जेजेबी) सुरु आहे. तर, अन्य सात आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कट आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमाअंतर्गत दोषी ठरवलण्यात आलं आहे. अपघाताच्या दोन महिन्यानंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

१९ मे रोजी रात्री पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये मोठा अपघात झाला होता. एका अल्पवयीन तरुणाने भरधाव कार चालवत दोघांना उडवले होते. यात इंजिनीअर तरुण-तरुणींचा जागीच मृत्यू झाला होता. काही तासांत अल्पवयीन तरुणाला जामीन मिळाला असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट होती. आरोपीला फक्त निबंध लिहिण्यास सांगण्यात आलं होतं. आरोपी तरुणाचे वडील हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकावडे यांनी सांगितलं की, पुण्यातील अपघात प्रकरणात आम्ही ९०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एकूण सात जणांची यात नावे आहेत. आरोपपत्र दाखल करण्यासाठी ५० साक्षीदारांचा जबाब घेतला आहे. आरोपपत्रामध्ये दुर्घटनेचा विश्लेषण रिपोर्ट, तांत्रिक साक्ष, फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा रिपोर्ट, डीएनए रिपोर्ट यांचा समावेश आहे.

पुणे पोर्शे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता याला दोन महिने झाल्याने प्रकरण काहीसं शांत झालं आहे. पोर्शे प्रकरणात अनेकांनी अल्पवयीन तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद होती. मात्र, प्रकरण तापल्याने पोलीस सक्रीय झाले होते. याप्रकरणी आरोपीचे आई, वडील आणि आजोबांना देखील अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT