eleventh Admission sakal media
पुणे

अकरावी प्रवेशासाठी ९४ हजार जणांची नोंदणी

राज्यात पहिल्या दिवशी ९४ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यासह (pune) राज्यातील पाच महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावी (FYJC) ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणीची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. राज्यात पहिल्या दिवशी ९४ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली. तसेच पुण्यातील १८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

या प्रवेश प्रक्रियेचे उद्‌घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांच्या उपस्थितीत ऑनलाइन झाले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिकेच्या ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रक्रियेतंर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज संबंधित शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून तपासून घेणे, अर्ज सबमिट करणे यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवातीला संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याचे विद्यार्थी, पालकांचे म्हणणे आहे. मात्र, अर्ज भरताना इंटरनेट सेवा विस्कळित होण्यासारखे प्रकार विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्तरावर झाले असतील. संकेतस्थळ सुरळीत सुरू असून त्यात कोणतीही तांत्रिक अडचणी आली नसल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT