sugar sugar
पुणे

कोलवडीत गूळ व साखरेचा ९ हजार ६२८ किलोचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : कोलवडी (ता. हवेली) येथील बोरमलनाथ गूळ उद्योगातील गुऱ्हाळावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून भेसळीच्या संशयावरून ९८ हजार २४० रुपये किंमतीचा ३ हजार ७० किलो गुळ आणि २ लाख २९ हजार ५३० रुपये किंमतीची ६ हजार ५५८ किलो साखर असा ९ हजार ६२८ किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

पुणे विभागाचे सहआयुक्त शि. स. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अ. ध. झांजुर्णे यांनी भेसळीविषयी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार कोलवडीतील बोरमलनाथ येथे गुऱ्हाळावर छापा टाकून कारवाई केली. यापुढेदेखील अन्न व औषध प्रशासनातर्फे अशा स्वरुपाची कारवाई सुरू ठेवली जाणार असून, नागरिकांनी अन्न भेसळीबाबत १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन परिमंडळ-३चे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT