98th Marathi Sahitya Sammelan  sakal
पुणे

98th Marathi Sahitya Sammelan : दिल्लीतील संमेलनाच्या अध्यक्षांची उद्या निवड; साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक

देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या तख्तावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिल्लीत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा निश्‍चित करण्यासाठी, कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि संमेलनाध्यक्षांची निवड करण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाची शनिवार (ता. ५) व रविवारी (ता. ६) पुण्यात बैठक होत आहे. देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या तख्तावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना आहे.

बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या सर्व संस्थांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी सादर झालेल्या नावांच्या प्रस्तावांवर बैठकीत चर्चा केली जाईल.

त्यानंतर सर्वसंमतीने एक नाव निश्‍चित केले जाईल. यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक विश्‍वास पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत विनय हर्डीकर आदी नावे चर्चेत आहे.

या नावांपैकी एका नावावर बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल किंवा ऐनवेळी देखील एखादे वेगळे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते.

आगामी संमेलनासाठी त्याच तोलामोलाचे आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या साहित्यिकाची निवड करण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे. महामंडळाची बैठक टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत होणार आहे. शनिवारच्या बैठकीत संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा, ग्रंथ दालनाचे नियोजन आदींवर चर्चा होणार आहे. रविवारच्या बैठकीत ही रूपरेषा अंतिम होणार असून संमेलनाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

पहिलेच ‘अभिजात मराठी साहित्य संमेलन’

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केल्यामुळे दिल्लीतील हे आगामी साहित्य संमेलन पहिलेच ‘अभिजात मराठी साहित्य संमेलन’ असेल. दिल्लीत संमेलन आयोजित करण्यामागे केंद्र सरकारवर अभिजात भाषेच्या दर्जासाठी दबाव वाढवावा, हाही एक उद्देश होता. मराठीला अभिजात दर्जा, हाच संमेलनाध्यक्षांसह अनेकांच्या भाषणाचा आणि कार्यक्रमाचा एक मुख्य अजेंडा राहण्याची शक्यता होती. केंद्राच्या घोषणेमुळे हा मुद्दा निकाली निघाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT