पुणे

पुणे : एटीएममध्ये पैसे भरणाऱ्यांनीच लुटले 99 लाख!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एटीएम मशिनमध्ये नियमित रोख रक्कम भरण्याची जबाबदारी असणाऱ्या एका खासगी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली तब्बल 99 लाख 56 हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राकेश जोशी, सुयश पवार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शैलेश डहाके (वय 34, रा. वारजे) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामधील काही बॅंकांच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्याचे काम ठाणे येथील सेक्‍युरिट्रान्स इंडिया प्रा. लि. या कंपनीस दिलेले आहे. फिर्यादी डहाके हे या कंपनीमध्ये मनुष्यबळ विकास अधिकारी आहेत. त्यांच्या कंपनीमध्ये एटीएम केंद्रात रोकड भरण्याचे काम अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे जोशी व पवार हे करीत होते.

दोघांना गेल्या महिन्यात जुना पुणे-मुंबई रस्ता परिसरातील अकरा एटीएममध्ये रोकड जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार, दोघांनी विविध बॅंकांच्या अकरा एटीएममध्ये रक्कम जमा केली; परंतु नियोजित रकमेपेक्षा कमी रोख रक्कम भरली. या पद्धतीने दोघांनी तब्बल 99 लाख 56 हजार रुपयांची रोख रक्कम चोरली.

बँकांच्या नियमित परीक्षणामध्ये अशा पद्धतीने पैसे चोरीस गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपासणी केल्यानंतर जोशी व पवार यांनीच हा प्रकार केल्याचे व त्यानंतर ते पळून गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी फिर्यादी यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

...अशी केली पैशांची चोरी !

एटीएम यंत्रात रोख रक्कम जमा करण्यासाठी बॅंकांकडून एक कोडवर्ड (सांकेतिक शब्द) दिला जातो. ज्या कंपनीकडे रोख रक्कम जमा करण्याची जबाबदारी असते, त्या कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांनाच हा कोडवर्ड माहिती असतो. जोशी व पवार या दोघांना हा कोडवर्ड माहिती होता. त्यादृष्टीने कोडवर्डचा गैरवापर करून एटीएममध्ये संपूर्ण रक्कम जमा केल्याची नोंद केली. प्रत्यक्षात मात्र विविध बॅंकांच्या अकरा एटीएम मशिनमध्ये त्यांनी कमी रोख रक्कम जमा केली. त्याद्वारे तब्बल 99 लाख 56 हजार रुपयांचा अपहार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोटार वाहन विभागावर ‘लक्ष्मीची कृपा’; महापालिकेकडून नवीन वाहने, यंत्रांच्या खरेदीवर ५८ कोटींचा निधी मंजूर

अग्रलेख : आभासी आनंद, खऱ्या वेदना!

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT