corona virus.jpg 
पुणे

अरे बापरे ! हवेली तालुक्याने गाठला हजाराचा टप्पा

सकाळवृत्तसेवा

खडकवासला (पुणे) : हवेली तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दररोज किमान ५० रुग्ण दररोज वाढत आहेत. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज ८० रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर तालुक्यात सोमवार अखेर रुग्ण संख्या ९९८वर पोचली आहे. हजार रुग्ण संख्येचा टप्पा गाठला आहे. तालुक्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगत आहे. येथे दाट लोकवस्ती आहे. त्यातील अनेक जण दोन्ही शहरात कामानिमित्त हजारोंच्या संख्येने नागरिक कामानिमित्त बाहेर पडत आहेत. तर अनेकजण या परिसरात कामानिमित्त येत आहेत. नऱ्हे, कोंढवे- धावडे, खानापूर, नांदेड, खडकवासला वाघोली, पिसोळी, मांजरी, लोणी काळभोर औतडे हांडेवाडी, कात्रज परिसरातील वाड्या येथे ही रुग्ण संख्या वाढत आहे. तालुक्यात सध्या 205 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


"रुग्ण संख्या वाढणाऱ्या गावात नागरिकांनी अधिकची काळजी घेतली पाहिजे. घरात राहून १० दिवसांच्या लॉकडाऊनला सहकार्य करा. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडल्यास अन्यथा कारवाई होईल. असे हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन खरात यांनी सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खरात यांनी सांगितले की, "तालुक्यात दिवसभरात ८०नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत ९९८ जणांना लागण झाली आहे. त्यातील १८जणांचा मृत्यू झाला आहे. ४०१ जण बरे झाले आहेत. तर ५९५ जणांवर उपचार सुरू आहे. यातील तिघेजण गंभीर आजारी आहेत. कोंढवे धावडे व येथील दोघांचा मृत्यू झाला. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवसांवरून 12 दिवस झाला आहे."

आज मंगळवारी पॉझिटिव्ह सापडलेले रुग्ण संख्या - ८०
किरकटवाडी ६
लोणी काळभोर ३
कदम वाकवस्ती ४
मांजरी बुद्रुक ११
होळकरवाडी २
वडकी १
खडकवासला ७
नऱ्हे १०
मालखेड ४
उरुळी कांचन ६
वाघोली १०
गुजर निंबाळकरवाडी १५
जांबुळवाडी १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT