Crime
Crime sakal
पुणे

Pune Crime : पुण्यात पंधरा वर्षीय मुलीवर 6 ‪नराधमांनी‬ केला बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून एकाने तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर पाच ते सहा जणांनी पिडीत तरुणीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी देत तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून एकाने तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर पाच ते सहा जणांनी पिडीत तरुणीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी देत तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

ओम राजु तिंबोळे (वय 19), जय राजु तिंबोळे (वय 18), अनिल जाधव (वय 22), सुनिल जाधव (वय 22), शुभम गोमटे (वय 21) व किरण जावळे ( वय 23, सर्व रा. औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पॉक्‍सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अनिल जाधव व अन्य संशयित आरोपींची पिडीत 15 वर्षीय मुलीशी ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेऊन अनिल जाधव याने सहा महिन्यांपुर्वी तिला चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

त्यावेळी मुलीची छायाचित्रे काढून त्याने हि छायाचित्रे त्याच्या मित्रांमध्ये प्रसारित केली. त्यानंतरही त्याने मुलीला धमकी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. 23 डिसेंबर रोजी जाधवने मुलीला बोलावून घेतले, त्यानंतर सहा जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. दरम्यान, या घटनेमुळे मुलगी मोठ्या प्रमाणात घाबरली होती, तिने याबाबतची माहिती तिच्या आईला दिली. त्यानंतर मुलीच्या आईने फिर्याद दिली. या घटनेची चतुःशृंगी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत संशयित सहा आरोपींना तत्काळ अटक केली. या प्रकरणाचा तपास चतुःशृंगी पोलिस घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT