Pune Bypoll Election
पुणे

Pune Bypoll : चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून पैशांचा पाऊस! पैसे वाटताना कार्यकर्ता गळाला

भाजपच्या तीन कार्यकर्त्यांकडे आढळले एक लाख ७० हजार

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता संपला. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास रहाटणी शिवराज कॅालणी तांबे शाळेजवळ भाजपचे प्रभाग क्र३३ चे अध्यक्ष माधव मनोरे यांना पैसे वाटप करताना पकडले. संदर्भात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक विभागाकडे अद्याप नोंद झालेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवून पंचनामा केला. व फिर्याद दाखल केली आहे, असे निवडणूक विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास रहाटणी शिवराज कॅालणी तांबे शाळेजवळ भाजपच्या तीन कार्यकर्त्यांकडे एक लाख ७० हजार रुपये रोख आणि कमळ चिन्ह असलेल्या मतदार चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

निवडणूक विभाग भरारी पथक प्रमुख विकास वारभुवन यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार माधव मल्लिकार्जुन मनोरे (वय 51, रा. मथुरा काॅलनी, रहाटणी), स्वप्नील सुरेश फुग, (वय 35, रा. फुगेवाडी), कृष्णा बालाजी माने (वय 24, रा. फुगेवाडी) यांच्या कडे एक लाख ७० हजार रोकड, कमळ चिन्ह असलेल्या मतदार चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या उपस्थितीत भाजप नेते, पदाधिकारी हे लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला असून ही लोकशाहीची हत्या झाल्याचा ठपका यांनी ठेवलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT