driving licence 
पुणे

ऑनलाईनचा घोळ;तरुणाच्या लर्निंग लायसनवर तरुणीचा फोटो

लायसन मिळाल्याचा पुण्यातील युवकाचा आनंद टिकला थोडावेळच !

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : लर्निंग लायसन ऑनलाईन पद्धतीने देणाऱ्या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला खरा... पण पहिल्याच दिवशी पुण्यातील एका युवकाने लायसन काढण्यासाठी परीक्षा दिली... उत्तीर्णही झाला..... त्याला लायसन मिळाले... पण ते बघून तो चक्रावलाच. कारण लायसन त्याचे आणि त्यावर फोटो भलत्याच युवतीचा होता.... त्यामुळे आता आरटीओमध्ये हेलपाटे मारण्याची त्याच्यावर वेळ आली आहे !

घरबसल्या ऑनलाईन लर्निंग लायसन काढण्याच्या उपक्रमाला राज्यात सोमवारी प्रारंभ झाला. या योजनेचा गाजावाजा झालेला होता. त्यामुळे पुण्यातील आशिष चेडे या युवकाने सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास लॉगइन केले. आधार, पॅनकार्ड त्याने परिवहन या वेबसाईटवर अपलोड केले. त्यानंतर परीक्षेचे ३६५ रुपये शुल्कही भरले. परीक्षा झाली. त्यात त्याला १५ पैकी ९ गुण मिळाले. त्यामुळे तो पास झाला. लगेचच त्याला वेबसाईटवर लर्निंग लायसन आले. त्याने तो डाऊनलोड केले. मात्र, त्यावेळी त्याला धक्काच बसला. कारण लायसनवर नाव, पत्ता त्याचा होता. फोटो मात्र, भलताच होता. या बाबत त्याने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधला. तेव्हा त्याला प्रत्यक्ष येण्यास सांगण्यात आले.

इंटिरीअर डिझाईनर या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणारा आशिष म्हणाला, ‘‘ऑनलाईन लर्निंग लायनस देणारी ही योजना खूप चांगली आहे. वेबसाईवटर कोणतीही अडचण आली नाही. मात्र, लायसनवर माझा फोटो आला नाही. फोटो भलत्याच मुलीचा आला. त्यामुळे लायसन मिळाल्याचा आनंद टिकला नाही. यामध्ये तातडीने बदल होण्याची गरज आहे.’’

या बाबत पुणे आरटीओमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ‘‘परिवहन ही वेबसाईट सक्षम आहे. तांत्रिकदृष्ट्याही अचूक आहे. मात्र, आधार कार्डच्या नोंदणीच्या वेळी काही तरी घोळ झाला असेल. ज्या उमेदवारांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाला लिंक झाले आहे, त्यांनाच हे लर्निंग लायसन ऑनलाईन पद्धतीने काढता येईल. आशिषच्या केसमध्ये आवश्यक असलेले बदल करून त्याला प्रत्यक्ष लायसन दिले जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT