pune
pune esakal
पुणे

Pune news : पोलिसांना धक्काबुक्की; १८ जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

दौंड : दौंड शहरात कारवाईसाठी निघालेल्या पोलिस हवालदार व त्यांच्या पथकाची दुचाकी अडवून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अठरा संशयितांपैकी पाच जणांवर गोमांस विक्री व वाहतूकप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

ही घटना शुक्रवारी (ता. १) सकाळी साडेअकरा वाजता घडली. दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार महेंद्र गायकवाड, कॅान्स्टेबल वाय. व्ही. पाटील, गृहरक्षक दलाचे जवान नबीलाल शेख व गोरक्षक आकाश भैसडे हे दोन दुचाक्यांवरून खाटीक गल्ली येथे गेले होते.

गोमांस विक्रीची माहिती मिळाल्याने कारवाईसाठी पोलिस पथक गेले होते. परंतु गोमांस न मिळाल्याने पोलिस पंचनामा करून परतत असताना इद्रिस कुरेशी याच्या घराजवळ पोलिसांना अडविण्यात आले. जमावाने पोलिसांशी हुज्जत घालून गोरक्षक आकाश भैसडे यास बेदम मारहाण केली.

दरम्यान, मारहाण सुरू असताना पाठीमागून पोलिस आल्यानंतर जमावाच्या तावडीतून आकाश भैसडे याची सुटका करण्यात आली. पोलिस हवालदार महेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार इद्रिस आबिद कुरेशी, आसिफ कासम कुरेशी, लाला ऊर्फ अश्पाक कासम कुरेशी, अकलाख वाहिद कुरेशी, हसन ऊर्फ लड्डू हाशमी कुरेशी, शाहरुख कुरेशी व इतर अज्ञात तेरा (सर्व रा. कुरेशी मोहल्ला जवळ, खाटीक गल्ली, दौंड) जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, दुखापत करणे, दंगल करणे, आदीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Gold Reserve: चार महिन्यात 24 टन सोन्याची खरेदी; आरबीआय इतके सोने का खरेदी करत आहे?

Bomb Threat: बेंगळुरुमधील नामांकित 3 हॉटेल्स हाय अलर्टवर; बॉम्बने उडवून देण्याची मिळाली धमकी

Latest Marathi News Update: सुरेंद्र अग्रवाल यांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी बालावले

Salman khan Firing: जेलमध्ये जीवन संपवलेल्या अनुजचा पोस्टमार्टम अहवाल अपुरा? राज्य सरकारवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

PM Modi Temple: असे मंदिर जिथे सकाळ-संध्याकाळ होते पंतप्रधान मोदींची पूजा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकार

SCROLL FOR NEXT