Sonu Nigam Night Show sakal
पुणे

Sonu Nigam Night Show : ‘सोनू निगम नाईट’ आज रंगणार ; सकाळ माध्यम समूहातर्फे पुणेकर रसिकांना मेजवानी

पुणेकर रसिक आतुरतेने वाट पाहत असलेली ‘सोनू निगम नाईट’ ही प्रसिद्ध गायक-संगीतकार सोनू निगम यांची मैफील शनिवारी (ता. ११) रंगणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ही मैफील सायंकाळी ६.३० वाजता कोथरूड परिसरातील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे रंगेल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकर रसिक आतुरतेने वाट पाहत असलेली ‘सोनू निगम नाईट’ ही प्रसिद्ध गायक-संगीतकार सोनू निगम यांची मैफील शनिवारी (ता. ११) रंगणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ही मैफील सायंकाळी ६.३० वाजता कोथरूड परिसरातील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे रंगेल.

कोहिनूर ग्रुप (कृष्णकुमार गोयल एंटरप्राईज) हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून ॲबिज किचन हे फूड पार्टनर, ‘सूर्यकांत काकडे अँड असोसिएट्स’ हे व्हेन्यू पार्टनर आणि रेडिओ सिटी हे रेडिओ पार्टनर आहेत. ‘ॲमनोरा पार्क टाऊन’ यांचे सहकार्य या मैफिलीला लाभले असून, लाइट बल्ब’ आणि ‘शुभम आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग’ हे आउटडोअर पार्टनर आहेत.

सायंकाळी ५.४५ वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळणार आहे. ‘व्हीव्हीआयपी’ आणि डायमंड सोफा तिकीटधारकांना प्रवेशाची आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा असलेल्यांना गेट क्रमांक एकमधून असेल. प्लॅटिनम, गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ आणि स्टँडिग या विभागातील तिकीट धारकांना गेट क्रमांक दोनमधून प्रवेश असेल. तसेच, चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधाही गेट क्रमांक दोनमधून असेल. तर दुचाकी वाहनांना पार्किंगची सुविधा गेट क्रमांक तीनमधून असेल. आसन व्यवस्थेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार असून काही जागा राखीव असतील.

सार्वजनिक वाहतुकीचा करा उपयोग

या कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध असली, तरी त्याची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे कार्यक्रमाला येणाऱ्या अधिकाधिक नागरिकांनी मेट्रो, बस, कॅब यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्याचे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे. कार्यक्रम स्थळापासून वनाज मेट्रो स्थानक हे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असून बस थांबा देखील नजीकच आहे.

दुपारपासूनच तिकिटे उपलब्ध

ज्या रसिकांनी bookmyshow.com आणि ticketkhidakee.com या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकिटे आरक्षित केली आहेत, त्यांना प्रत्यक्ष कागदी तिकीट घेणे अनिवार्य आहे. कार्यक्रमस्थळी म्हणजेच सूर्यकांत काकडे फार्म्स येथे बॉक्स ऑफिसवर हे कागदी तिकीट घेण्याची सुविधा दुपारी एक वाजल्यापासून उपलब्ध असेल. गेट क्रमांक दोनमधून प्रवेश केल्यावर हे बॉक्स ऑफिस लगेच दिसू शकेल. सायंकाळी ऐनवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी अधिकाधिक रसिकांनी दुपारीच ही तिकिटे घ्यावीत, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT