A leopard attack in Pilanwadi resulted in the death of a calf last night Sakal
पुणे

Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाची कालवड ठार

Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड जागीच ठार झाली.ही घटना पिलानवाडी नजीक गोरोपाटा येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

संतोष काळे

दौंड: 'पिलाणवाडी' येथे काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात कालवड जागीच ठार झाली.ही घटना पिलानवाडी नजीक गोरोपाटा येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली .

शरद सोपान शिंदे यांच्या जनावरांच्या गोठ्यात गायची कालवड बांधली होती . मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करत कालवडीला उसाच्या शेतात नेऊन फस्त केले.

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे येथील नागरिक भयभीत झाली असून वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे. अशी मागणी शरद शिंदे ,माणिक शिंदे यांच्यासह पिलानवाडी ग्रामस्थांनी केली आहे .दरम्यान घटनास्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामे केली असून शवविच्छेदनाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवलेला आहे .सदर कालवडीचे आम्हाला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी येथील शेतकरी शरद शिंदे यांनी केली आहे.

राहू बेटपरिसरात भर दिवसा बिबट्याचे दर्शन तसेच वाढणारे हल्ले हे चिंतेची बाब बनली आहे .वन विभागाने याला त्वरित आळा घालावा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे. भविष्यात मानवी जीविताला काय धोका निर्माण झाल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही फिरू देणार नाही. वरिष्ठ कार्यालयाला टाळत ठोकू असा संतप्त इशारा पिलानवाडी येथील ग्रामस्थांनी 'सकाळ'शी बोलताना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Work in Germany: जर्मनीत काम करण्याची सुवर्णसंधी; 7 लाखांहून अधिक पदं रिक्त, कोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी?

Omkar Elephant : ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ, आणखी ५ हत्तींच्या कळपाने वनविभागाला दिलं आव्हान

Crime News : जामिनावर सुटलेल्या खुनाच्या संशयिताची मिरवणूक काढणे तरुणांना भोवले; नाशिक रोड पोलिसांनी काढली धिंड

"आम्ही ठरवून एकमेकींना फॉलो करत नाही" दीपिकासोबत भांडणाच्या चर्चांवर फराहचं स्पष्टीकरण ; म्हणाली..

Nashik News : उत्सव नवरात्रीचा तयारी महापालिकेची!; साडेतीन वर्षांची कसर भरण्यासाठी इच्छुकांकडून ‘इव्हेंट्स’ची धूम!

SCROLL FOR NEXT