Pune  sakal
पुणे

Pune : गंभीर गुन्ह्यातील पुरावे गोळा करणार ‘आय-बाईक’ ; पुण्यात नवा प्रयोग,गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होणार

एखादा गुन्हा घडल्यास त्याचा छडा लावून आरोपीला शिक्षा होण्यासाठी घटनास्थळावरील भौतिक पुरावे महत्त्वाचे ठरतात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एखादा गुन्हा घडल्यास त्याचा छडा लावून आरोपीला शिक्षा होण्यासाठी घटनास्थळावरील भौतिक पुरावे महत्त्वाचे ठरतात. हे सबळ पुरावे एकत्रित करण्यासाठी पुणे शहर पोलिस दलात आता इन्व्हेस्टिगेटिव्ह बाईक (आय-बाईक) पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोचण्यासह गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.

नवीन कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने शहर पोलिस आयुक्तालयाकडून पावले उचलली जात आहेत. सात वर्षे आणि त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात न्यायवैद्यक पथकातील कर्मचाऱ्यांनी (फॉरेन्सिक टीम) घटनास्थळी भेट देणे बंधनकारक आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आय-बाईक पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने प्रारंभी परिमंडळनिहाय आय-बाईक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आय-बाईकवर दोन-दोन पोलिस कर्मचारी तैनात असतील. घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने भौतिक पुरावे गोळा करून ते व्यवस्थित सिलबंद करण्यात येतील. त्यानंतर ते पुरावे तपासी अधिकाऱ्यांना सोपविण्यात येणार आहेत.

आय-बाईकवर विज्ञान शाखेचे ज्ञान असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांना प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील रासायनिक विश्लेषक व वैज्ञानिक सहाय्यकांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. घटनास्थळी तत्काळ पोचण्यासाठी दुचाकींचा वापर केला जाणार आहे. परिमंडळ निहाय पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार आय-बाईक पथकातील कर्मचारी कार्यरत राहतील.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात दहा आय-बाईक प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. भविष्यात आय-बाईक पथकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यामुळे गुन्ह्यातील भौतिक पुरावे गोळा करून तपास अधिकाऱ्यांना आरोपींपर्यंत पोचणे शक्य होणार आहे.

- शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा).

आय-बाईक कर्मचाऱ्यांची कर्तव्ये

  • शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण

  • पहिल्या टप्प्यात २० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

  • मुख्य नियंत्रण कक्षाकडून आय-बाईक कर्मचाऱ्यांना तत्काळ माहिती

  • प्रत्येक आय-बाईक पथक वॉकीटॉकीसह सुसज्ज

आय-बाईक कर्मचाऱ्यांची कर्तव्ये

  • मुख्य नियंत्रण कक्षातून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रवाना

  • कामकाज पूर्ण झाल्यानंतर स्टेशन डायरीत नोंद

  • शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा करून नोंद ठेवणे

  • प्रत्येक सोमवारी साप्ताहिक अहवाल सादर करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT