पुणे

आळंदीत रथाची बैलजोडी दाखल

CD

आळंदी, ता. ४ : आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीत यंदाच्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला आळंदीतील सहादू कुऱ्हाडे यांची हौश्या व बाजी ही बैलजोडी जुंपण्यात येणार आहे. कर्नाटकातील यादवाड व नंदगाव या दोन गावातून सुमारे साडे सहा लाख रुपयांना ही बैलजोडी खरेदी केल्याची माहिती कुऱ्हाडे यांनी दिली.

२९ जूनला आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने देऊळवाड्यातून होणार आहे. दरम्यान (ता. ३०) आळंदीतून पालखी पुण्याकडे जाताना पालखी चांदीच्या रथात ठेवली जाते. यावेळी रथाला जुंपण्यात येणारी बैलजोडी ही सहादू कुऱ्हाडे यांची आहे. आळंदीतील काही स्थानिक लोकांची बैलजोडी निवड समितीचे आहे. हे सदस्य बैलजोडीचा मान ठरवतात. त्यानुसार आळंदीतील सहादू कुऱ्हाडे यांच्या घराला हा मान मिळाला.

दरम्यान, खिलारी जातीची दोन बैल कर्नाटकातून खरेदी केले. सध्या ही बैलजोडी आळंदीत असून बैलांकडून दररोज चालण्याचा सराव करून घेतला जात आहे. त्याचप्रमाणे बैलांना दररोज खुराकही दिला जातो. सरकी, शेंगदाणा पेंड, उडीद डाळ, मका भरडा, गहू, भुसा, गव्हाचे पीठ, कडबा तसेच दूधही खुराक म्हणून सध्या या बैजोडीला दिले जात असल्याची माहिती श्री कुऱ्हाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

Marathi News Live Updates : मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबई मेट्रोची स्पेशल सर्व्हिस! मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा, शेवटची ट्रेन कधी धावणार?

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

SCROLL FOR NEXT