पुणे

पावसाची ‘जोरधार’ सलामी

CD

काटेवाडी, ता. ९ : भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये मॉन्सून सरींनी जोरदार सलामी दिली. रविवारी (ता. ९) रात्री बारामतीमध्ये १२६ मिलिमीटर, तर इंदापूरमध्ये तब्बल १४५ मिलिमीटर, अशा विक्रमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खरीप हंगामाला बूस्टर डोस मिळणार आहे. सहाजिकच पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मागील वर्षभरापासून भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांना शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. मागील वर्षी सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये झाला होता. जिल्ह्यातील बारामती, इंदापूर पुरंदर, शिरूर, राजगड (वेल्हे), मुळशी, दौंड आदी तालुक्यांमधील मागील वर्षी खूपच रोडावली होती. या तालुक्यांमधील ९५ गावांमध्ये दुष्काळी सर्वेक्षण देखील झाले होते. जून महिन्यामध्ये खास करून सरासरीच्या ५० टक्के कमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती समाधानकारक राहिली आहे.
जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ आदी तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण काल कमी राहिले आहे. बारामतीमधील बारामती शहर (१०९ मि.मी.), सोमेश्वरनगर (८०.९ मि.मी.), जळगाव कडेपठार (८०.२ मि.मी.), जळगाव सुपे (८१ मि.मी.), सोनगाव (७८.४ मि.मी) आदी जिरायती व बागायती गावांमध्ये मॉन्सूनच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. पावसाची स्थिती समाधानकारक राहिली तर खरीप हंगाम यावेळी साधला जाणार आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने चांगली हजेरी लावल्याने बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग उडाली आहे.

जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये) : हवेली : १०३.७, मुळशी : ५२.७, भोर : १००.९, मावळ : २७.४, राजगड (वेल्हे) : ८९.९, जुन्नर : १३.३, खेड : ३५.३, आंबेगाव : ३०.६, शिरूर : ५३.६, बारामती : १२६.६, इंदापूर : १४५.६, दौंड : ९०.३, पुरंदर : ५६.१.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT