junner sakal
पुणे

कोंबरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक ऊसतोडणी मजूर जखमी

वनविभागाने परिसरात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी

अर्जुन शिंदे, आळेफाटा

बेल्हे : कोंबरवाडी (बेल्हे) ता. जुन्नर येथे आज (ता. २६) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना, एका ऊसतोडणी मजुरावर बिबट्याने हल्ला केल्याने तो ऊसतोडणी मजूर तरुण जखमी झाला. त्याच्या उजव्या हाताला व डोक्याला बिबट्याच्या नख्या लागल्याने जखमा झाल्या आहेत.

कोंबरवाडी (बेल्हे) येथे शिवाजी तुकाराम गुंजाळ यांच्या ऊसाच्या शेतात, कालपासून ऊसतोडणी मजुरांच्या सहाय्याने ऊसतोडणी सुरू होती. आज (ता. २६) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सात - आठ ऊसतोडणी मजूर उर्वरित ऊसाची तोडणी व ऊसाच्या बांधलेल्या मोळ्या जमा करत होते. यावेळी ऊसाच्या शेतात असलेल्या बिबट्याने अचानक सुरेश नामदेव माळी (वय - २८ ) वर्षे मुळ रा. चाळीसगाव जि. जळगाव या ऊसतोडणी मजुरावर झेप घेत हल्ला केला.

यावेळी सोबतच्या इतर ऊसतोडणी मजुरांनी आरडाओरडा केल्याने तसेच संबंधित जखमी झालेल्या ऊसतोडणी मजुराने प्रसंगावधान राखत आरडाओरडा करत हातातील ऊस तोडणीचा कोयता उगारल्याने बिबट्याने पळ काढला. यावेळी बिबट्याच्या पंजाच्या नख्या लागल्याने ऊसतोडणी मजुराच्या उजव्या हातावर खोलवर जखमा झाल्याचे सांगण्यात आले.

यावेळी संबंधित शेतकरी शिवाजी गुंजाळ यांच्यासह त्यांच्या मुलाने, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऊसतोडणी मजूरास, तातडीने बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याबाबत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष टी. एल. गुंजाळ यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. दरम्यान बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. असीम आतार यांनी, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऊसतोडणी मजुरावर प्राथमिक उपचार केले.

यावेळी संबंधित शेतकरी शिवाजी गुंजाळ यांच्यासह त्यांच्या मुलाने, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऊसतोडणी मजूरास, तातडीने बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याबाबत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष टी. एल. गुंजाळ यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. दरम्यान बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. असीम आतार यांनी, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऊसतोडणी मजुरावर प्राथमिक उपचार केले.

त्यानंतर जखमी ऊसतोडणी मजुरास पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. कोंबरवाडी परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठे असून, बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे दिवसाही बिबट्या दिसत असल्याचे शिवाजी गुंजाळ यांनी सांगितले. दरम्यान शासनाच्या वनविभागाने परिसरात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी, ग्रामस्थांच्या वतीने तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष टी. एल. गुंजाळ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT