Shaniwar Wada  sakal
पुणे

Shaniwar Wada : शनिवारवाड्याच्या तटबंदीवर झाड कोसळले

मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात शनिवारवाड्याच्या तटबंदीवर झाड पडल्याने ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाले. ही घटना घडून २४ तास उलटून गेले तरीही अद्याप झाड काढण्यात आलेले नाही. केवळ फांद्या छाटण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात शनिवारवाड्याच्या तटबंदीवर झाड पडल्याने ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाले. ही घटना घडून २४ तास उलटून गेले तरीही अद्याप झाड काढण्यात आलेले नाही. केवळ फांद्या छाटण्यात आल्या आहेत.

लाल महालकडून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे झाड उन्मळून शनिवारवाड्याच्या तटबंदीवर पडले. त्यामुळे पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असलेल्या ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाले आहे. झाड पडल्याचे निदर्शनास येऊन २४ तास होऊन गेले. पण अजूनही ते पूर्णपणे भिंतीवरून बाजूला करण्यात केलेले नाही. केवळ फांद्या छाटण्यात आल्या आहेत. याबाबत महापालिकेच्या वारसा व्यवस्थापन विभागाला माहिती नसल्याचेही समोर आले.

कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अमोल पवार म्हणाले, ‘‘पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्याच्या आतील फांद्या तोडून काढून घेण्यात आल्या आहेत. पण शहरात एका ठिकाणी झाड पडल्याने रस्ता बंद झाला. त्यामुळे येथील पथक दुसरीकडे गेल्याने काम अर्धवट राहिले आहे. पूर्ण झाड काढून घेतले जाईल.’’

भवन विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख म्हणाले, ‘‘शनिवारवाड्याच्या तटबंदीवर झाड पडले आहे, याची माहिती आमच्या विभागाला देण्यात आलेली नाही. पण पुढील कार्यवाही करण्यात येईल.

वाकलेल्या झाडांचा धोका

शनिवारवाड्याच्या भोवती मोठी झाडे आहेत. यातील काही झाडे शनिवारवाड्याच्या बाजूने, तर काही झाडे रस्त्याच्या बाजूने झुकलेली आहेत. वादळामध्ये ही झाडे पडून ऐतिहासिक वास्तूसह नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने वेळीच उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT