Pune Crime News  sakal
पुणे

Pune Crime News : कोरेगाव पार्कच्या महिलेला दोन कोटी रुपयांना गंडा ; कुरिअरमध्ये अमली पदार्थ असल्याची बतावणी

कुरिअर कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची दोन कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कुरिअर कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची दोन कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथील ज्येष्ठ महिलेने (वय ६९) याबाबत सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी २६ एप्रिलला स्काईप आयडीवरुन महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला. आरोपीने फेडेक्स कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून आकाश कुमार बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही मुंबई विमानतळावर फेडेक्स कुरिअर कंपनीकडून एक पार्सल पाठविले होते.

सीमाशुल्क विभागाने ते पार्सल जप्त केले असून, त्यात ‘एलएसडी’ अमली पदार्थांच्या १२० स्ट्रीप आढळून आल्या आहेत. याशिवाय पाच पासपोर्ट आणि कपडे आहेत. याबाबत मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोत गुन्हा दाखल केला असून, अटक होण्याची भीती दाखवली.

आरोपींनी महिलेला कारवाई टाळण्यासाठी त्यांच्या बॅंक खात्यातील रक्कम आपल्या खात्यात पाठविण्यास सांगितली. कारवाईच्या भीतीने महिलेने दोन कोटी आठ लाख रुपये खात्यात ट्रान्स्फर केले. त्यानंतर आरोपींनी त्यांचा मोबाईल ब्लॉक केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT