sugar museum sakal media
पुणे

पुण्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणार

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील साखर उद्योगाची उलाढाल सुमारे ८० हजार कोटींची. त्यामध्ये महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान महत्त्वपूर्ण.. अशा या साखर उद्योगाविषयी सर्वांना माहिती व्हावी, यासाठी पुण्यातील साखर संकुलातील पाच एकर जागेत जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि जर्मनीमध्ये साखर संग्रहालये आहेत. परंतु ती केवळ मर्यादित स्वरूपात. मात्र, साखर उद्योगाची संपूर्ण माहिती असलेले हे जगातील पहिलेच साखर संग्रहालय ठरणार आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्त गायकवाड यांनी राज्य सरकारला पाठविला होता. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात उत्तर प्रदेशानंतर अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये साखर उद्योगाचे महत्त्वाचे स्थान आहे. राज्यातील ऊस आणि साखरेचे उत्पादन, गूळ, खांडसरी साखर तसेच, साखरेपासून बनणारे उपपदार्थ, आसवनी, प्रकल्प, इथेनॉल, कंपोस्ट खत, सहवीज निर्मिती याची माहिती या संग्रहालयातून होणार आहे. हे संग्रहालय शेतकरी, पर्यटक, विद्यार्थी आणि जगभरातील अभ्यासकांना उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरणार आहे. साखर संग्रहालयाच्या उभारणीसाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. साखर आयुक्त कार्यालयाला तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

साखर कारखान्याची मिनी प्रतिकृती

या संग्रहालयात साखर कारखान्याची मिनी प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यामध्ये अद्ययावत यंत्रसामग्री उभारण्यात येणार आहे. साखरेची निर्मिती प्रत्यक्षात कशी होते, याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. तसेच, प्रत्यक्ष समोर तयार झालेल्या ताज्या साखरेची गोडीही पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

साखर संग्रहालयामध्ये हे पाहता येणार

  • गूळ निर्मितीचे सूक्ष्म प्रतिकृतीद्वारे प्रात्यक्षिक

  • साखर उद्योगाबाबत डिजिटल प्रदर्शन

  • साखर उद्योगात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तुंचे विक्री केंद्र

  • प्रेक्षागृह, शुगर थीम कॅफे

  • सहकारी साखर चळवळीची माहिती देणारे कला दालन

  • सुसज्ज ग्रंथालय, ॲम्फी थिएटर

  • जागतिक स्तरावरील आणि देशांतर्गत साखरेसंबंधी आवश्यक माहिती

  • पार्किंग सुविधा

"महाराष्ट्राची साखर उद्योगातील ओळख अधिक तेजस्वी व्हावी, तसेच साखर उद्योगात जागतिक पातळीवर महाराष्ट्राला स्थान मिळवून देण्यासाठी साखर संग्रहालयाची आवश्यकता आहे. या संग्रहालयातून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साखर उद्योगातील विविध प्रकल्पांची माहिती उपलब्ध होणार आहे."

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT