crime news sakal
पुणे

वर्षभर फरारी असलेल्या गुन्हेगारास पिस्तुलासह अटक

पिस्तुल बाळगल्याच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने धनकवडी परिसरातुन अटक केली

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पिस्तुल बाळगल्याच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने धनकवडी परिसरातुन अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त केले.

महेश उर्फ मिट्या राजेंद्र नवले (वय 23, रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनीट एकचे पोलिस कर्मचारी 16 ऑगस्ट 2020 रोजी शहरात गस्त घालत होते. त्यावेळी सुरज अडागळे हा सराईत गुन्हेगार पिस्तुल घेऊन संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस मॅगझीनसह जप्त केले होते.

त्यास पिस्तुल व काडतुस महेश नवले याने दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात नवले हा एक वर्षापासून फरारी होता. दरम्यान पोलिस कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार व इम्रान शेख हे गस्त घालीत असताना त्यांना नवले हा धनवकवडी येथील यशवंतनगर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, थोरात, पवार, शेख, राहुल मखरे, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्यानेच अडागळेला पिस्तुल दिल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडे आणखी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातुन एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT