Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार

पोलिसांना घर दाखविल्याच्या संशयावरून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. त्यानंतर टोळक्याने कोयते हवेत फिरवत नागरिकांना धमकी देत परिसरात दहशत माजविली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिसांना घर दाखविल्याच्या संशयावरून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. त्यानंतर टोळक्याने कोयते हवेत फिरवत नागरिकांना धमकी देत परिसरात दहशत माजविली.

महम्मद प्यारे शेख (वय २७, रा. आश्रफनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ताहेर इफ्तिगार शेख (वय १८, रा. कोंढवा), अरबाज इलियास खान (वय २५, रा. आश्रफनगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महम्मदने अरबाजचा साथीदार तबरेजचे घर पोलिसांना दाखविल्याचा संशय आरोपींना होता. गुरुवारी सायंकाळी महम्मद कोंढव्यातील कोणार्क पूरम सोसायटीच्या परिसरातून निघाला होता.

त्यावेळी आरोपींनी ‘तू तबरेजचे घर पोलिसांना का दाखविले?,’ अशी विचारणा करून महम्मदच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यावेळी धावून आलेल्या नागरिकांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी कोयते हवेत फिरवत नागरिकांना धमकी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT