Lokmanya Society Sakal
पुणे

Pune News : लोकमान्य सोसायटीतर्फे ‘आदिशक्ती ठेव’ योजना

आदिशक्तीची उपासना ही आपल्या परंपरेची ओळख आहे. नवरात्रीच्या काळात विशेषतः महिलांसाठी अधिकचा परतावा देणाऱ्या ‘आदिशक्ती ठेव’ योजनेचा ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे प्रारंभ करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आदिशक्तीची उपासना ही आपल्या परंपरेची ओळख आहे. नवरात्रीच्या काळात विशेषतः महिलांसाठी अधिकचा परतावा देणाऱ्या ‘आदिशक्ती ठेव’ योजनेचा ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणुकदारांना ९.६० टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. ही योजना अठरा महिन्यांसाठी असून यात महिलांना ०.५० टक्के इतका अधिकचा व्याजदर मिळणार आहे.

महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही अर्धा टक्के अधिकच्या व्याजदराचा लाभ या योजनेद्वारे घेता येईल. ठेवीदार-सभासद या योजनेमध्ये किमान दहा हजार रुपयांची गुंतवणूक करू शकतात. सोप्या गुंतवणूक प्रक्रियेसह मर्यादित कालावधीसाठी चांगला परतावा मिळवून देणाऱ्या या योजनेमध्ये नवरात्रीच्या काळात अधिकाधिक गुंतवणूक करून लाभ घेण्याचे आवाहन ‘लोकमान्य सोसायटी’ तर्फे करण्यात आले.

गुंतवणूकदार घरबसल्या ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’च्या (www.lokmanyaonline.com) माध्यमातूनही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘लोकमान्य सोसायटी’च्या कोणत्याही शाखेत किंवा १८०० २१२ ४०५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ठेवीदार-सभासद-गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT