लोणी काळभोर, ता. ११ : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे लाल मातीच्या व्यवहारातील अवघ्या पाच हजार रुपयांच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सात जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
नर्सरी व्यवसायासाठी लागणाऱ्या लाल मातीच्या व्यवहारावरून मनीष जवळकर आणि केतन जवळकर यांच्यात वाद झाला. मनीष जवळकर यांच्या तक्रारीनुसार, ठरलेले पैसे देऊनही अतिरिक्त पाच हजार रुपयांची मागणी करत केतन व कुणाल जवळकर यांनी त्यांना रस्त्यात अडवून लोखंडी हत्याराने वार केले. या हल्ल्यात मनीष व त्यांचा भाऊ जखमी झाले असून, त्यांच्यावर मांजरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे, केतन जवळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्या वादाचा राग धरून पाच जणांनी त्यांच्या घरात घुसून आई-वडील व भावाला मारहाण केली, तसेच घराबाहेर उभी असलेली कार आणि दुचाकीची तोडफोड करून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गणेश जवळकर, मनीष जवळकर, राहुल जवळकर, सचिन जवळकर आणि धनंजय जवळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.