Kishor Tambe Sakal
पुणे

Crime News : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेले किशोर तांबे यांची झाली हत्त्या; आरोपींना अटक

शेतात दारू प्यायला ये असे सांगून दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावून घेतले. शेतात गेल्यानंतर झटापट झाली.

सकाळ वृत्तसेवा

शेतात दारू प्यायला ये असे सांगून दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावून घेतले. शेतात गेल्यानंतर झटापट झाली.

आळेफाटा - आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार, तांबेवाडी (ता. जुन्नर) येथील किशोर तांबे हे बुधवार (दि.५) पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे चुलत भाऊ संतोष तांबे वय ४२ रा. तांबेवाडी, ता. जुन्नर) यांनी दिली होती.

सदर तक्रारीवरून आळेफाटा पोलिसांनी चक्रे फिरवत डॉग पथकाच्या साह्याने शोध घेत कॅनॉल असलेल्या विहिरीमध्ये मृतदेह असल्याचं निष्पन्न झाले. या संदर्भात पांडुरंग जिजाबा तांबे (वय-३९ राहणार तांबेवाडी, तालुका जुन्नर) व महेश गोरकनाथ कसाळ (वय-३०, राहणार आळेफाटा, तालुका जुन्नर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपींची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, बुधवार (दि.५) रोजी किशोर तांबे यांना शेतात दारू प्यायला ये असे सांगून दारू पिण्याच्या बहाण्याने त्याला शेतात बोलावून घेतले.

शेतात गेल्यानंतर आरोपी व किशोर तांबे यांच्यात झटापट झाली. किशोर तांबे यांना आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण केली. या झटपटीत त्यांचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्यांचा मृतदेह एका पोत्यात भरून विहिरीमध्ये टाकून दिला. मृतदेह वर तरंगू नाही म्हणून पोत्यात दगडी भरली. व पाण्यात मृतदेह फेकून दिला. हा खून मुरूम व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे तसेच आमची बदनामी करतो याचा मनात राग धरून आरोपींनी केला असल्याचे निष्पन्न झाले असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Minister absence from Cabinet Meeting : शिवसेनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला का होते गैरहजर?, उदय सामंतांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले...

बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला लागली आग; थोडक्यात वाचला अभिनेता

आता १६ तासांचा प्रवास फक्त ८ तासांत! विदर्भ समुद्री मार्गाने मुंबईशी जोडला जाणार; पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Jalgaon Crime : जळगाव हादरले! रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह, कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप; हर्शल भावसारची दुचाकी बेवारस

Jalgaon Sports Complex : जळगाव जिल्हा क्रीडासंकुलाला ऑलिंपिक टच! खानदेशातला पहिला अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक साकारणार

SCROLL FOR NEXT