Gutkha Seized Sakal
पुणे

Crime News : आळेफाटा पोलिसांनी पकडला ३१ लाख ४ हजार रुपयांचा गुटखा

आळेफाटा पोलिसांनी पकडला ३१ लाख ४ हजार रुपयांचा गुटखा

सकाळ वृत्तसेवा

- राजेश कणसे

आळेफाटा - आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातहुन पुण्याकडे बेकायदा गुटख्याची वाहातुक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुणे- नाशिक महामार्गावरील आळे (ता. जुन्नर)गावच्या हद्दीत डोंगरे फर्निचर या दुकानासमोर नाकाबंदी केली असता, गुजरात हून आलेला एम.एच.१७ के.ए.९७१७ हा टेम्पो पोलीसांना संशयीत रित्या आढळुन आल्याने टेंम्पो चालकाची चौकशी केली.

त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर सदरचा टेंम्पो चेक केला असता, त्यामध्ये विनापरवाना, बेकायदेशीर रित्या प्रतिबंधित असलेला विमल कंपनीची सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू, व आर.एम.डी. नावाची सुगंधित सुपारी असा एकुन ३१ लाख ४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने टेम्पो चाऊलक ओंकार हिरामण सांडभोर (वय-२२, राहणार सांडभोर वाडी, रा. राजगुरूनगर, जि. पुणे) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन, ४६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल टेंम्पो ट्रक सह जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, अनिल पवार, सहफौजदार चंद्रशेखर डुंबरे, विनोद गायकवाड, प्रल्हाद आव्हाड, पंकज पारखे, अमीत माळुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे, राजेंद्र आमले, पोलीस मित्र नामदेव पानसरे यांनी केली. पुढील तपास सुनील बडगुजर हे करत आहेत.

दरम्यान दोनच दिवसांपुर्वी गुजरातहुन पुण्याकडे आलेला ९ लाख रुपयांचा गुटखा आळेफाटा पोलिसांणी पकडलेला असताना आज पुन्हा आळेफाटा पोलिसांनी ३० लाख रुपयांचा गुटखा पकडल्याने पोलीसांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT