RTE News sakal
पुणे

RTE Protest News : आरटीईतील बदलांविरोधात ‘आप’चे आंदोलन

शिक्षण हक्क कायद्यामधील (आरटीई) शाळा प्रवेशाच्या बदलांविरोधात आम आदमी पार्टी आणि पालक संघटनांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यामधील (आरटीई) शाळा प्रवेशाच्या बदलांविरोधात आम आदमी पार्टी आणि पालक संघटनांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन केले. नव्या बदलांमुळे एक किलोमीटर परिसरात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास संबंधित परिसरातील विना अनुदानित शाळेत आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जाणार नाही.

या निर्णयाला सर्व स्तरांतून विरोध केला जात आहे. हा आदेश मागे घ्यावा, या मागणीसाठी आंदोलन केल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. नव्या बदलांमुळे गरीब मुलांना कुठल्याही खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे दुरावली आहे.

या बदलांमुळे वंचित आणि दुर्बल घटकांतील मुले यांच्यासाठी सरकारी शाळा आणि श्रीमंतांसाठी खासगी इंग्रजी शाळा अशी विभागणी होणार आहे. या पद्धतीमुळे शिक्षणातील सामाजिकीकरणाच्या उद्देशाला हरताळ फासला जाईल, असा आरोप ‘आप’कडून केला. आर्थिक, सामाजिक स्तरांमुळे येणाऱ्या अडचणी दूर करत खासगी शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकांसाठी २५ टक्के राखीव जागा ठेवणे हेच न्यायपूर्ण आहे.

त्यामुळे सरकारने केलेली दुरुस्ती ही न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी आहे, असा आरोप ‘आप’चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला. यावेळी शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पालक आघाडीच्या ललिता गायकवाड आदी उपस्थित होते. सरकारने हा बदल करणारा आदेश मागे घ्यावा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन पालक करतील, असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT