पुणे

मशागत

CD

झाडाला पिकलाय आंबा
शिवाजी मरगीळ
.............
आंबा हा फळांचा राजा. पिकलेल्या आंब्याची मधुर गोडी रसाळ गोडवा जेवणाची तृप्ती वाढविते. आमरसाची गोडी अमृतासारखी अविट, नवसंजीवनी देणारी. डोंगर टापूत नदीकाठनं आमराईची दाटी. फळांचा राजाची गोडी चाखणारे आम्ही माणसं. दिलदार मनाचे डोंगरचे राजेच जणू. गावखरी लावगणीची आमराई. ओढ्याच्या काठानं आजा-पंजानं लावलेली. खास गावरानी आंब्याची दहा, पंधरा झाडं. चव अन् रंगावरून आंब्याची नावं ठेवलेली. शेंद्र्या रंगाचा शेंद्र्या आंबा. पांढऱ्या रंगाचा पांढरा आंबा. आंबटखट असलेला आंबट्या. भुईमुगावनी लागणारा भुईमुग्या. साखरंवनी गोडचिट ती साखरगोटी. वाळकावनी महूर वाळक्या आंबा. खारकंवनी स्वादिष्ट खारक्या आंबा. असे कितीतरी आंब्यांची नावं.
मला सगळं आठवतंय तवा मी दहा, बारा वर्षांचा असेल. आमराई पाडाला आलेली झाडावरचे आंबे उतरवून घ्यायचे. आंबे उतारी खुडी-पवरीनं आंबे उतरायचे. पाडाचे आंबे खाली गळायचे. आम्ही धनवर पाडं खायचे. आंब्याच्या वाटन्या करायच्या. वाटणीचे आंबे घरी आणायचे. मोठ्या टोपलीत गवतात पिकू घालायचे. गर्मीनं चार - पाच दिवसांत आंबे पिकायचे. आंब्याचा घमघमाट वाड्यात यायचा. आजा ढाळजंत बसायचा. रोज आमरसाचं जेवण असायचं. आज्यासंग एक-दोन पाहुणे पंगतीला जेवायचे.

रोज मुक्कामाला चार-दोन वाटसरू थांबायचे. आजाच्या संग-मंग जेवायचे. आखेदीपासून आमरसाचा आगर असायचा. पावने-रावळे आंबे खायला जमायचे. लेकीबाळी माहेरला यायच्या. महिनाभर आंब्याची चंगळ असायची. पुरण-पोळी आमरसाचा बेत ठरलेला. आम्ही सकाळी आंब्यावर ताव मारायचा. पिकलेले डालीतले आंबे हाताळायचे. मोठ्ठीमाय आंबे धुऊन ठिवायची. हातानं आंबे माचायचे. आंबे पोटभर खायचे. आम्ही अन् पाहुन्याच्या लेकरांनं वाडा भरायचा. सुट्टीचे सारे जण आजोळी यायचे. आंबे खाण्याचा जणू वरवाच लावलेला. आंबे खाऊन तोंडं भरायची. अंगावरच्या कपड्यावर रसाचे डाग पडायचे. वाड्यात कोईचा ढीग पडायचा. तवा आंब्याचा सुकाळं असायचा. खाणारी तोंड कमी असायची. आता खाणारी तोंडं वाढलेली अन् आंब्याची झाडं वाळून गेलेली.

आता शहरात वास्तव्यास आलेलं. आंबे विकतचे खायला. नातवालाही आंबे आवडतेत. आम्ही गावरानी आंबे खाल्लेले. नातू केसर आंबे फोडी कररून खातोय. त्याला मी गंमतीने म्हणतोय ‘बाळा आम्ही आंब्याच्या ढिगावर लोळलोत. खेळलोत. त्याला हे खरे वाटत नाही. काळाचा महिमा आगाध. आंबा घरी पिकायचा. रस गळायचा. आमरस अमृतासारखा सेवन करायचा. आमची पिढी गावरान आमरसावर पोसलेली. पोक्त वाढलेली! आवंदा बाजारात मायंदळ आंबे आलेत. परवा धोंड्याचा महिना सुरु झालाय. आता महिनाभर आमरस पुरणपोळीचे बेत. धोंडे जेवनाची चंगळ पाहुण्यांची वर्दळ. आतातर आंब्याचा भर हंगाम. आमरसाची मधुर रसाळी खायची. आमरसाचा कधीच कंटाळा नाय. जेवणात पोटभर आमरस खायचा. जेवण झाल्यावर वाटिभर आमरसाचा प्यायचा अन् तृप्तीचा ढेकर द्यायचा!


९९२१९४९०४५
(लेखक हे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी पत्रकारांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? भारतावर विश्वास का ठेवावा? पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी दिले सडेतोड उत्तर

Everest Base Camp Trek: २१० किलोमीटरचा खडतर हिमालयीन प्रवास; आळंदी-पिंपरी चिंचवडच्या डॉक्टरांचा साहसी पराक्रम, १६ दिवसांचा थरारक प्रवास पूर्ण..

Ajit Pawar NCP: महाराष्ट्रात नवा ‘राजकीय चाणक्य’ सक्रिय! अजित पवारांच्या पक्षात मोठे बदल, प्रशांत किशोर यांची पुण्यात एंट्री

Mumbai News: वांद्र्यात रेल्वेचा बुलडोझर! गरीबनगरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई; परिसरात तणावाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT