Bharati Vidyapeeth Sakal
पुणे

भारती विद्यापीठाकडून ‘आम्ही भारतीय’ मोहीम सुरू

‘भारती विद्यापीठाचे आजी व माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि हितचिंतकांना एकमेकांशी जोडण्यासाठी ‘आम्ही भारतीय’ ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘भारती विद्यापीठाचे (Bharati Vidyapeeth) आजी व माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि हितचिंतकांना एकमेकांशी जोडण्यासाठी ‘आम्ही भारतीय’ (Aamhi Bhartiy) ही मोहीम (Campaign) सुरू करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत,’’ अशी माहिती भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भारती विद्यापीठाच्यावतीने या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव, कुलसचिव जी जयकुमार या वेळी उपस्थित होते.

डॉ. विश्वजित म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारती विद्यापीठदेखील हीरक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या ५८ वर्षांमध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील, तळागाळातील, सर्वसामान्य, कष्टकरी कुटुंबातील युवा पिढीला शिक्षणातून समृद्धीकडे नेण्यासाठी विद्यापीठ झटत आहे.’’

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘विद्यापीठाने घडविलेले कर्तृत्ववान विद्यार्थी हीच विद्यापीठाच्या कार्याची खरी ओळख आहे. विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच नेहमी समाजहिताला प्राधान्य दिले आहे. ‘आम्ही भारतीय’ या मोहिमेच्या माध्यमातून निर्माण होणारा संवाद सेतू विद्यापीठाच्या सामाजिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल. ’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT