Aandar-maval
Aandar-maval 
पुणे

ग्रामीण पर्यटनाची लूटा मजा

रामदास वाडेकर

टाकवे बुद्रुक - लोणावळा- खंडाळ्यामुळे मावळ तालुक्‍याचे नाव आधीच जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीने पर्यटकांची पावले आपसूक मावळच्या ग्रामीण भागाकडे वळू लागली. निसर्गसौंदर्याने नटलेले नाणे, आंदर व पवन मावळ पर्यटकांना मोठे आकर्षण ठरू लागले आहे. सह्याद्रीच्या कडेपठारावरून फेसाळत वाहणाऱ्या धबधब्याखाली भिजायचे, सभोवतालची हिरवीगार वनराई न्याहाळायची आणि लालमातीतील भातखाचरातून येणारा सुगंध अनुभवायचा, असा पर्यटकांचा बेत असतो. घरगुती पद्धतीने चुलीवर रांधलेला इंद्रायणीच्या गरमागरम भातावर ताव मारून माघारी निघायचे, असे वीकेंडला ‘वनडे ट्रिप’च्यिा नियोजनाला पर्यटक पसंती देत आहेत.

अबब... एकाच भागात १५ धबधबे
निसर्गाचे वरदान लाभलेल्या आंदर मावळात कान्हे फाटा रेल्वे फाटक ओलांडून गेले, की दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी स्वागत करते. फळणे फाट्यावरून उजवीकडून पुढे गेल्यावर माऊपासून धबधब्याला सुरवात होते. हे अंतर कान्हेवरून बारा किलोमीटरवर आहे. मोरमारेवाडी, गभालेवाडी, वडेश्वर, कुसवली, कांब्रे, डाहुली, बेंदेवाडी, खांडीवरून सावळामार्गे आल्यावर पिंपरी, तळपेवाडी, माळेगाव, पारिठेवाडी, कशाळ अशा सुमारे पंधरा धबधब्यांत भिजता येईल. माऊजवळील मारमारेवाडीतून डोंगरवाडी रस्त्याने सटवाईवाडीला जाता येते. हा रस्ता डोंगरवाडीपर्यंत चांगला असून, पावसामुळे पुढचे काम ठप्प आहे. पण, अर्धा तास पायी चालून सटवाईमातेचे दर्शन घेता येईल. हे प्राचीन मंदिर निसर्गाच्या कोंदणात वसलेले आहे. 
(अंतर - कान्हेपासून १८ किलोमीटर)

डोळ्यांत साठवा कोकण
कुसूरला माउंट व्यूह, खांडीच्या अठरा नंबर पाहता येईल. येथून दिसणारे कोकणातील विहंगम दृश्‍य पर्यटकांना डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखी आहे. पर्यटकांनी जाताना वडेश्वरमार्गे खांडीला जावे आणि येताना सावळा पिंपरीमार्गे भोयरेवरून पुन्हा फळणे फाट्यावर यावे. आंदर मावळात जाणारे हे दोन्ही रस्ते फळणे फाट्यावरून एक डावीकडे, तर दुसरा उजवीकडे वळतो. ही सगळी पर्यटनस्थळे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत दोन ते चार किलोमीटरवर आहेत. 
(महामार्गावरून अंतर - खांडी ३५, तर सावळा ४० किलोमीटर)

नाष्टा किंवा जेवाल कुठे?
 स्वतः स्वयंपाक करून जेवणार असाल तर टाकवे बुद्रुकच्या बाजारपेठेत सर्व जिन्नस उपलब्ध
 टाकवेत नाष्टा व जेवणाची चांगली सोय
 वडेश्वर, भोयरे, डाहुली, लालवाडी, सोपावस्ती, चिरेखान येथे घरगुती शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय 
 टाकवे बुद्रुक, वडेश्वर येथे चारचाकी वाहनांची पंक्‍चर काढण्याची सोय
 भोयरे कुणेत दुचाकी वाहने पंक्‍चर काढण्याची सोय
 टाकवे बुद्रुक येथे पेट्रोल पंपाची सोय

काय खबरदारी घ्याल...
 वळणाचा तसेच अरुंद रस्ता असल्याने वाहने सावकाश चालवावीत
 आंद्रा व ठोकळवाडी धरणाचा फुगवटा असल्याने पर्यटकांनी पाण्यात उतरण्याचा मोह टाळावा
 धबधब्याकडे जाताना चिखलाची पाऊलवाटेने जाताना काळजी घ्यावी
 डाहुलीजवळचे दोन धबधबे आणि दोन बंधारे पाहायला वेळ ठेवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT