AAP agitation against redevelopment of Bal Gandharva pune  sakal
पुणे

बालगंधर्वच्या पुनर्विसकासाविरोधात ‘आप’चे आंदोलन

बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. पण पालकमंत्री अजित पवार आणि प्रशासक विक्रमकुमार यांनी हा ठेवा नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या विरोधात आम आदमी पक्षाने आज (ता. ९) बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन केले. रंगमंदिराच्या पुनर्विकासाची प्रक्रिया पुणेकरांना अंधारात ठेवून राबविली जात असून, चार वर्षानंतर अचानक प्रशासक आल्यानंतरच हा प्रस्ताव पुढे का आणला असा प्रश्‍न ‘आप’ने उपस्थित केला आहे. बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. पण पालकमंत्री अजित पवार आणि प्रशासक विक्रमकुमार यांनी हा ठेवा नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१८ ला राष्ट्रवादी काँग्रेसने हे नाट्यगृह पाडण्यास विरोध केला होता, पण आता प्रशासकांना हाताशी धरून हा निर्णय घेतला. पुनर्विकासाच्या नावाखाली महानगरपालिकेच्या इतर नाट्यगृहांचा यापूर्वीच खेळखंडोबा झालेला आहे. त्यात परत आता बालगंधर्वचा पुनर्विकास केला जाणार आहे. बालगंधर्व पाडण्याची मागमी कोणी केली होती याची माहिती कलाकार, रसिकांना नाही. ही माहिती सार्वजनिक केली पाहिजे. सर्व प्रक्रिया पथदर्शकच झाली पाहिजे. तसेच नागरिकांना आणि कलाकारांची विश्‍वासात घेऊन पुढील वाटचाल निश्‍चीत करावी अशी मागणी ‘आप’चे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली. प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bhandara News : साकोलीत वाघाचा थरार! उमरझरी शिवारात मिरची तोडणाऱ्या महिलेवर पट्टेदाराचा हल्ला; १० फूट फरफटत नेले, सुदैवाने जीव वाचला

जेवर विमानतळाचे मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन! 'नोएडाला येण्यास आधीचे मुख्यमंत्री घाबरायचे'; अंधश्रद्धेचा पाढा वाचत पंतप्रधानांचा विरोधकांवर प्रहार

Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

Mumbai News :ठाणे पालिकेत गटार अन् पायवाटांमध्ये २५६० कोटींचा 'झोल'? नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा घणाघात; मालमत्ता वाटपातही २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT