BJP_Adesh_Gupta 
पुणे

शिवराज्याभिषेक दिनासंबंधी भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्विट; पुण्यात पोलिसांत तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनासंबंधी आक्षेपार्ह ट्वीट केले. याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी संबंधिताविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी गुरुवारी रात्री शिवराज्याभिषेक दिनासंबंधी एक ट्वीट केले. त्यामध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत या दिवसाला 'हिंदू साम्राज्य दिवस' घोषित करून शुभेच्छा दिल्या.

काही महिन्यांपूर्वी भाजप नेते आणि तत्कालीन दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित केले गेले होते. त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचया इतिहासाची मोडतोड करण्याचा कुटील डाव दिल्लीतून सातत्याने रचला जात असल्याचे शिंदे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

शिंदे यांनी गुप्ता यांच्याविरुद्ध ऑनलाइन तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कडक कारवाई व करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आपतर्फे शुक्रवारी दिवसभर भाजप नेत्याविरुद्ध एक हॅशटॅग वापरून चांगलाच समाचार घेण्यात आला, अशी माहिती मुकुंद किर्दत यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind Vs SA 2nd Test : भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीचा भाऊ गौतम गंभीरवर संतापला; म्हणाला, दादागिरी दाखवली की हेच होतं...

तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! अवघ्या पंधरा मिनिटांत फेब्रुवारीचे बुकींग 'फुल्ल', दर्शन पास मिळणे झाले कठीण!

मला रेट विचारला जातोय... नॅशनल क्रश झाल्यावर गिरीजाला येतायत तसले मेसेज; म्हणते- हे लोक माझ्या समोर आले तर...

Latest Marathi News Live Update : रायगड जिल्ह्यात शिवसेना–राष्ट्रवादी संघर्ष चव्हाट्यावर

Sunscreen: थंडी वाढली तरी विसरू नका सनस्क्रीन! जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले महत्त्वाचे कारण

SCROLL FOR NEXT