Aap Party Sakal
पुणे

AAP Party : आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा 29 तारखेला बारामतीत

आम आदमी पार्टीची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा सोमवारी (ता. 29) बारामतीत येणार

मिलिंद संगई,

बारामती - आम आदमी पार्टीची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा सोमवारी (ता. 29) बारामतीत येणार आहे. नगरपरिषदेसमोर जाहीर सभा होणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी बारामतीत आलेल्या पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी ही माहिती दिली.

आम आदमी पार्टी जनसामान्यापर्यंत पोचवणे, लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडणे, सत्तेतील वतनदारांना हटवून सर्वसामान्यांसाठी काम करणारे सर्वसामान्यांचे राज्य आणणे ही या यात्रेची उद्दिष्टे आहेत.

राज्याच्या सर्व भागातून आलेले आपचे किमान शंभर पुर्णवेळ कार्यकर्ते या यात्रेत सहभागी असणार आहेत. पंढरपूर येथे (ता. 28) रोजी सुरु होणारी ही यात्रा पंढरपूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, नवी मुंबई, पनवेल या मार्गाने जाऊन राज्याभिषेकदिनी 6 जून रोजी रायगड किल्ल्यावर पोचणार आहे.

यावेळी या यात्रेच्या नियोजनासाठी आलेल्या पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बारामतीतील नागरिकांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT