aap will contest elections to local bodies MP sanjay singh announcement politics  esakal
पुणे

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘आप’ लढविणार

‘आप’च्या महासंकल्प सभेत खासदार सिंह यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्ष (आप) आता महाराष्ट्रातील पुणे महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी सोमवारी (ता.११) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केली.

आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने आज पुण्यात महासंकल्प जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते. यावेळी ‘आप’चे महाराष्ट्राचे सह प्रभारी गोपाल इटालिया,

राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, धनंजय शिंदे, संघटक मंत्री अजित फाटके, संदीप देसाई, नविंदर अहलुवालिया, रियाज पठाण, अजित खोत, हनुमंत चाटे, मनीष मोडक, भूषण धाकुलकर, चंदन पवार, कनिष्क जाधव,मुकुंद किर्दत आदी उपस्थित होते.

खासदार सिंह पुढे म्हणाले, ‘‘दिल्ली आणि पंजाब या राज्यात परिवर्तन होऊन तेथे आम आदमी पक्षाची सत्ता आली आहे. याचीच पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात नक्की होणार, हा माझा विश्वास आहे.

‘आप’ने बलाढ्य राजकीय पक्षांना घाम फोडण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त इडी, सीबीआयच्या जिवावर विरोधी पक्षाची सरकारे पाडून तेथे भाजपची सरकारे स्थापन करण्याची सवय लागली आहे.

भाजपने जनतेला एकमेकांशी जातींच्या आधारे लढविण्याचे काम केले आहे. अदानीने सर्व देशच विकत घेतला आहे. आजच्या घडीला आकाशात उडणारे विमान अदानीचे, समुद्र अदानीचा, कोळसा अदानीचा यामुळे नरेंद्र मोदी फक्त अदानीचे पंतप्रधान आहेत. भाजपच्या सरकारमध्ये शेतकरी चिंतेत आहेत. सर्वसामान्य माणूस महागाईच्या खाईत लोटला गेला आहे. देशात सर्वत्र भ्रष्टाचार फोफावला आहे.’’

गोपाल इटालिया म्हणाले,‘‘आम्ही ज्यांना मतदान केले, त्यांनी आम्हाला फक्त काळोख दिला आहे. आता आम्हाला चांगल्या शिक्षणाची, दवाखान्यांची आवश्यकता आहे. यासाठी आता शेतकरी, कामगार, महिला विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला लढायचे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वप्नांचा महाराष्ट्र बनवायचा आहे. त्यासाठी सर्वांना कष्ट उपसावे लागणार आहेत.’’

‘आप’चा झाडू भाजपचे भूत उतरविणार

भारतीय जनता पक्ष हा देशातील इडी’, ‘सीबीआय’ यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून आणि ‘मोदी वॉशिंग पावडर’चा वापर करून विरोधी पक्षांची बहुमतातील सरकारे पाडत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरातून महाराष्ट्रासह विविध राज्यात सरकार आणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावर सत्तेचे भूत स्वार झाले आहे. पण भाजपचे हे सत्तेचे भूत ‘आप’चा झाडूच उतरविणार असल्याचे मत खासदार संजय सिंह यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT